68th National Awards 2022: आज (22 जुलै) दुपारी 4 वाजल्यापासून देशाचा एक मोठा इव्हेंट साजरा होणार आहे. आज 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम नवी दिल्ली येथे संपन्न होणार असून यातून विजेत्यांची घोषणा केली जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सोहळ्यातून अनेक चित्रपटांना आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. हा सोहळा नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून या सोहळ्यातून कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पीआयबी इंडियाने आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे ही माहिती दिली आहे.


हे असू शकतील मानकरी...
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी चित्रपटांमध्ये पहिले नाव येते ते सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह' या चित्रपटाचे. यानंतर 'सरदार उधम सिंग', त्यानंतर 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' आणि 'लायनेस'. या चित्रपटांशिवाय साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चाही समावेश आहे. विकी कौशलचा चित्रपट 'सरदार उधम सिंग' आणि सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट 'शेरशाह' पुरस्कारांच्या यादीत आघाडीवर असू शकतात. हे दोन्ही चित्रपट उत्कृष्ट आहेत आणि त्यात साकारलेली दोन्ही पात्रेही खूप खास होती. या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विकी कौशल यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली.


कंगना पुन्हा उठवणार राष्ट्रीय चित्रपटांवर मोहोर?
गेल्या वर्षी अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. कंगना राणौत, मनोज बाजपेयी यांच्याशिवाय साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आणि धनुष यांनाही 67 व्या राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवन, दिल्ली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. कंगना राणौतला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तर मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. 


अनेक श्रेणींमध्ये लोकांना हा पुरस्कार दिला जाईल. प्रत्येक विभागासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. मात्र, यावेळी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.