मुंबई : आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत छाप सोडणारी जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमानची चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळकेसाठी निवड करण्यात आली होती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली होती.  वहिदा रहमान यांना यावर्षी 'दादा साहेब फाळके जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. वहिदा रहमान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. ब्लॅक एण्ड व्हाईटपासून  चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 ऑगस्ट 2023 रोजी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्याच वेळी, आता याचा सादरीकरण सोहळा आज म्हणजेच 17 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडत आहे. भारताच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करत आहेत. या सोहळ्यासाठी अनेक चित्रपट सेलिब्रिटी दिल्लीत पोहोचले आहेत. 


ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वहिदा रहमान यांना हिंदी सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. वहीदा रहमान आणि देव आनंद यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.  वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी वहिदा रहमान यांना आनंदाअश्रू अनावर झाले. हा पुरस्कार स्विकारताना त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसलं.


वहिदा रहमान यांनी आपल्या अभिनयाने  सिनेसृष्टीवर राज्य केलं आहे. देव आनंद, राज कपूर, राजकुमार, मनोज कुमार आणि सुनील दत्त यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांसोबत त्यांनी पडद्यावर काम केलं आहे. वहिदा रहमान यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 रोजी चेन्नई येथे झाला आणि 1955 मध्ये त्यांनी तेलुगू इंडस्ट्रीत प्रवेश केला. 


त्यानंतर 1956 मध्ये CID या चित्रपटातून त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला. मात्र, वहिदा रहमानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. पण त्याची भूमिका खूप पसंत केली गेली. यावेळी चाहत्यांना वहिदा आणि गुरु दत्त यांची जोडी खूप आवडली. प्यासा, कागज के फूल, चौधरी का चांद, साहिब बीवी आणि गुलाम यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्यासोबत काम केलं.