69th National Film Awards Moments: आलिया, क्रिती अन् पुष्पराज अल्लुसह पंकज त्रिपाठींचा सन्मान
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होऊन एक महिना झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सर्व विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलिया भट्ट, पंकज त्रिपाठी आणि कृती सेनन राजधानीत पोहोचले. तिन्ही स्टार्सना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
मुंबई : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होऊन एक महिना झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सर्व विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलिया भट्ट, पंकज त्रिपाठी आणि कृती सेनन राजधानीत पोहोचले. तिन्ही स्टार्सना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार तिथे उपस्थित होते. तसेच अल्लू अर्जुन देखील या सोहळ्याचा एक भाग बनला होता. हा सन्मान मिळवणारा तो पहिला दाक्षिणात्य अभिनेता आहे.
यावेळी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना देशातील सर्वात मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्यावर शाल देऊन त्यांना पुरस्कारही दिला. यावेळी विज्ञान भवनात बसलेल्या सर्व दिग्गजांनी स्टॅण्डिंग ओवेश दिली आहे.
आलिया भट्टला 2022 मध्ये गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यामध्ये आलियाने गंगूबाई ही भूमिका साकारली होती.
2021 मध्ये रिलीज झालेल्या मिमी या चित्रपटासाठी क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्रींचा उत्कृष्ट अभिनय पाहून ज्युरी सदस्यांना आलिया आणि क्रिती यांच्यापैकी एकाची निवड करणे कठीण झालं होतं म्हणून हा पुरस्कार विभागून देण्यात आला.
यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याला मिळाला आहे. 'पुष्पा' या चित्रपटासाठी त्याला हा सन्मान मिळाला आहे. राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब मिळवणारा तो दक्षिण चित्रपटातील पहिला अभिनेता आहे.
करण जोहरला शेरशाह या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड देण्यात आला. यासह गायिका श्रेया घोषालला पाचव्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
पुरस्कृत. पल्लवी जोशीला काश्मीर फाइल्ससाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
मिमी या चित्रपटात पंकज त्रिपाठीही महत्त्वाच्या भूमिकेत होते. जो प्रथम क्रितीला सरोगसीसाठी पटवून देतो आणि नंतर अडचणी आल्यावर पूर्ण पाठिंबा देतो. पंकजचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांना आवडतो. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.