मुंबई : (South Superstar) दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा मनोरंजन क्षेत्रात असलेला दबदबा सगळ्यांनाच माहित आहे. रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच वय कितीही असो पण सर्व वयोगटातील अभिनेत्री अजूनही त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत त्यांच्या अभिनेत्री म्हणून दिसतात. आता एका नवीन अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. ही अभिनेत्री लवकरच रजनीकांत यांच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या दोघांची जोडी ज्या चित्रपटात दिसणार आहे, त्या चित्रपटाचे नाव 'जेलर' (Jailer) आहे. रजनीकांत यांची ही सहकलाकार अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 


आणखी वाचा : 'ज्या चित्रपटात शाहरुख खान तो फ्लॉपच', सलमानच्या चाहत्यांचा Shahrukh ला विरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांचा आगामी 'जेलर' या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट 'बीस्ट' फेम दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित करणार आहेत. नेल्सन दिलीपकुमार यांचा या आधी प्रदर्शित झालेला चित्रपट हिट झाला नाही तरी देखील रजनीकांत यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 


आणखी वाचा : 'या' सेलिब्रिटींचा MMS व्हायरल होताच सर्वत्र खळबळ, Video पाहून चाहते ही च्रकावले


दरम्यान, अजून या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत मुख्य अभिनेत्रीच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. पण निर्मात्यांनी अभिनेत्री कोण असणार आहे हे ठरवले असून लवकरच अभिनेत्रीचं नाव सांगणार आहेत अशी चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तमन्ना भाटिया सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'जेलर' चित्रपटात एण्ट्री करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अजून करण्यात आली नाही. 


आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर


इनसाइड रिपोर्ट्सवर म्हणण्यानुसार, या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांतसोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तमन्ना या चित्रपटात रोमँटिक भूमितेक दिसणार आहे. तमन्ना लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. हैद्राबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाल्याचेही समोर आले आहे. 


आणखी वाचा : चिमुरड्याचा गळ्याला अजगराचा विळखा, पुढे काय झालं? जीवाची धाकधुक वाढवणारा व्हीडिओ व्हायरल


एवढेच नाही तर बाहुबली फेम अभिनेत्री राम्या कृष्णन देखील रजनीकांत यांच्या या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीने स्वत: या गोष्टीला दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की ती 10 ऑगस्टपासून 'जेलर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राम्या कृष्णनने प्रभास स्टारर 'बाहुबली'मध्ये शिवगामीची भूमिका साकारून सगळ्यांची मने जिंकली.


आणखी वाचा : सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...


राम्या लवकरच 'लिगर' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीनं विजय देवरकोंडाच्या आईची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर पोहोचणार आहे. 25 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राम्या कृष्णनचा हा तिसरा पॅन इंडिया रिलीज चित्रपट आहे.