वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 72 Hoorain चा ट्रेलर प्रदर्शित!
72 Hoorain Trailer : `72 हूरें` चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. असं असताना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं चित्रपटाच्या ट्रेलरला लाल कंदिल दिल्यानं आता निर्मात्यांनी त्याला थेट डिजीटली प्रदर्शित केला आहे.
72 Hoorain Trailer : '72 हूरें' या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. काही लोकांना त्याच्यावर आक्षेप घेतला आहे तर काही लोकांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. या सगळ्यात चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं हिरवा कंदिल दिला असला तरी ट्रेलर प्रदर्शनासाठी नकार दिला. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर थेट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आहे.
'72 हूरें' चा ट्रेलर हा 2 मिनिट 31 सेकंदाचा आहे. यात दहशतवादी लोकांचं जग दाखवलं आहे. ट्रेलर प्रमाणे दहशतवादी सगळ्यात आधी लोकांचे ब्रेनवॉश करतात. त्यानंतर त्यांना निष्पाप लोकांचे प्राण घेण्यास भाग पाडतात. दहशतवाद्याचा असा विश्वास आहे की जे व्यक्ती आपल्या प्राणाची आहुती देत, इतर लोकांचे जीवन संपवतात त्यांना स्वर्गात जागा मिळते. CBFC प्रमाणे, ते प्रेक्षकांच्या भावनांचा आणि त्यांच्यावर याचा होणारा परिणाम पाहता. ट्रेलरला हिरवा कंदिल देऊ शकत नव्हते.
पत्रकार परिषदेत या ट्रेलरविषयी अशोक पंडित म्हणाले, "एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चित्रपटाचा सेन्सॉर वेगळा आणि ट्रेलरचा सेन्सॉर वेगळा असतो, याविषयी मला याबद्दल तंत्रज्ञांना विचारावे लागेल. चित्रपटाचा सेन्सॉर तर माझ्याकडे आहे. त्यामुळेच आम्हाला हे पुरस्कार मिळाले आहेत. आता तुम्ही जो ट्रेलर पाहिला, त्यात एका पायाचा शॉट आहे, जो ट्रेलरमधून काढून टाकण्यात आला आहे. त्यांनीच हा शॉट काढून टाकण्यास सांगितले होते. पण गंमत अशी आहे की हा सीन चित्रपटात देखील आहे. पण ट्रेलर मधून काढून टाकण्यास सांगने हे कसे योग्य आहे असा प्रश्न सेन्सॉर बोर्डला आम्ही करत आहोत."
पुढे याविषयी बोलताना अशोक पंडित म्हणाले, "दुसरं त्यांनी कुरान हा एक शब्द काढून टाकण्यास सांगितले. तो चित्रपटात देखील आहे. तो एक संपूर्ण डायलॉग आहे. मी आज एक आणखी महत्त्वाची गोष्ट बोलणार आहे. ती ही आहे की हा चित्रपट कोणताही धर्म, कोणत्याही कोणत्याही मानवतेच्या विरोधात नाही. हा चित्रपट सामान्यवादाशी संघर्ष करत आहे. आम्ही शेवटच्या क्षणी आमचा ट्रेलर लाँच करत आहोत. त्यामुळे चित्रपटात जे सीन, डायलॉग्स तुम्हाला मान्य आहेत, ते ट्रेलरमध्ये का नाहीत. आज आम्ही हा ट्रेलर प्रदर्शित करणार आहोत, तेव्हा तुमचा त्यावर आक्षेप आहे." दरम्यान, हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत आहे.