मुंबई : नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ८ दोन ७५  फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत, तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक  चित्रपट महोत्सवांमध्ये  ९०  पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे.


८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. एन्जॉय एन्जॉय हे गाणं आयुष्य साजरं करण्याचा संदेश देते. गणेश निगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केेलं आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत करताना एन्जॉय एन्जॉय तर व्हायलाच हवं.


अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.



फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने  केली आहे. चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलरवरून चित्रपटाचा लुक अत्यंत फ्रेश दिसतो आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी १९ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.