जादू ओसरली, ९० च्या दशकातील बोल्ड अभिनेत्रीला यशाची हुलकावणी
वापसीसाठी खास प्रयत्न
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिरोडकर 90 च्या दशकात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. 20 नोव्हेंबर 1969 मध्ये जन्मलेली शिल्पा फक्त 20 वर्षांची असताना तिने करिअरला सुरूवात केली. शिल्पाला अभिनय ही वारसे परंपरेत मिळालेली आहे. शिल्पा यांची आई गंगू बाई या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तर आजी मीनाक्षी शिरोडकर या देखील लोकप्रिय अभिनेत्री होत्या.
1989 मध्ये शिल्पाने भ्रष्टाचार या सिनेमातून करिअर क्षेत्रात सुरूवात केली. या सिनेमात शिल्पाच्या समोर अभिनेता मिथुन चक्रवर्ती होता. शिल्पाला 1990 मध्ये किशन कन्हैया या सिनेमातून ओळख मिळाली.
शिल्पाने त्यानंतर बोल्ड सीन देऊन बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला. या सिनेमातील 'राधा बिना' या गाण्यात पारदर्शी साडी नेसली होती. या सिनेमात तिच्या अपोझिट अनिल कपूर होता.
यानंतर शिल्पाने पुढील 10 वर्षांत करिअरमध्ये अमिताभ बच्चन, गोविंदा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि मिथुन चक्रवर्तीसोबत काम केलं आहे. मात्र शिल्पाच्या काही सिनेमांनी खास कमाल केला नाही.
त्यानंतर करिअरमध्ये फ्लॉप झालेल्या सिनेमानंतर तिला ती उंची गाठण कठीण झालं. करिअरमध्ये पुढे काही खास होत नसल्यामुळे शिल्पाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि ती बॉलिवूडपासून दूर झाली.
2000 मध्ये यूकेतील बँकर अपरेश रंजीतसोबत शिल्पाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर शिल्पा लंडनमध्ये राहू लागली. शिल्पाची एक मुलगी असून तिच्यानंतर नम्रता शिरोडकरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
शिल्पाचं अभ्यासात कमी लक्ष होतं आणि तिने हे स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे. 10 मी नापास असूनही मला याबद्दल काहीच वाटत नाही. सुरूवातीपासूनच मी अभ्यासात कमी होती त्यामुळे अभिनय क्षेत्रात आली ते चांगल झालं असं शिल्पा सांगते. पण जेव्हा परदेशात गेले तेव्हा थोडी जाणीव झाली की, शिक्षण खूप महत्वाचं आहे.
2013 मध्ये शिल्पा शिरोडकर छोट्या पडद्यावर आली. 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेतून शिल्पीने तब्बल 13 वर्षांनी वापसी केली. यानंतर 2016 मध्ये 'सिलसिला प्यार का' यामध्ये काम केलं.