Raja Hindustani Full Movie : काळ गाजवणाऱ्या चित्रपटांपैकी एक असणाऱ्या कलाकृतींच्या यादीत अनेकांचीच पसंती गतकाळातील काही चित्रपटांना मिळताना दिसते. यातलंच एक नाव म्हणजे, 'राजा हिंदुस्तानी'. या चित्रपटातील गाणी म्हणून नका किंवा मग चित्रपटातील पात्र. प्रत्येक कलाकारानं चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि अगदी सहाय्यक भूमिकेत दिसणारी कलाकार मंडळीसुद्धा लोकप्रिय झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राजा हिंदुस्तानी'मध्येच भूमिका साकारत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेलं आणखी एक नाव म्हणजे नवनीत निशान. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं नवनीतला प्रसिद्धीझोतात आणलं खरं, पण त्यानंतर मात्र काही थोडेथोडके चित्रपट वगळता ती हळुहळू या रुपेरी पडद्यापासून दुरावत गेली. 


या चित्रपटालाच जवळपास 28 वर्ष झाली, तर मग इतक्या वर्षांनंतर ही अभिनेत्री कशी दिसतेय तुम्हाला माहितीये? नवनीतचा सध्याचा लूक पाहण्यापूर्वी तिच्या कारकिर्दीचा आढावा घेतला जाणंही महत्त्वाचं. कधी सहाय्यक भूमिका तर, कधी खलनायकी भूमिकांमध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीनं शाहरुख खानच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटामध्येसुद्धा भूमिका साकारली होती. नवनीत कायमच चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे तिनं स्त्रीपात्रांना साचेबद्ध रुपात न पाहता कायमच नव्या रुपात सादर केलं. तिचा मॉडर्न लूक अनेकदा लक्ष वेधून गेला. तेव्हापासूनचं तिचं फॅशनसाठीचं वेड आजही कायम असल्याचं पाहायला मिळतं.


हेसुद्धा वाचा : विराट-अनुष्का पाठोपाठ बॉलिवूडची 'ही' हॉट अभिनेत्री झाली अलिबागकर; केली 2 कोटींची गुंतवणूक



ती सध्या काय करते? 


नवनीत सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असली तरीही मायानगरी मुंबईपासून मात्र ती दूर गेलेली नाही. याच शहरात तिनं आपल्या नव्या कारकिर्दीची सुरुवात केली असून, ती सध्या ज्वेलरी डिझायनिंग आणि ड्रेस डिझायनिंगचं कामही करते. मुंबईत तिचे अनेक बुटीक असून, विविध अभिनेत्रींची ती पर्सनल डिझायनर आहे. बहुतांश वेळा परदेशवारीवर असणारी नवनीत सोशल मीडियावरही सक्रिय आहे. तुम्ही तिला प्रथमदर्शनी ओळखू शकता का?