मुंबई : oscars 2020 कलाविश्वात आणि मुख्य म्हणजे चित्रपटांच्या दुनियेत विशेष स्थान असणाऱ्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठीची नामाकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. यंदाच्या वर्षी या मानाच्या पुरस्कार सोहळ्याचं हे ९२वं वर्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्याच्या शर्यतीत 'जोकर' या चित्रपटाच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजेच एकूण, ११ नामांकनं देण्यात आली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्तोत्कृष्ट अभिनेता, मूळ संगीत, छायांकन, संकलन, पटकथा अशा विभागांमध्ये 'जोकर'ला नामांकनं मिळाली आहेत. 


भारतीय प्रमाण वेळेनुसार १० फेब्रुवारीला हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. 'जोकर'च्या खात्यात गेलेली नामांकनं पाहता या चित्रपटाच्या वाट्याला किती पुरस्कार येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त 'जोकर'च नव्हे, तर क्विंटन टरँटिनोचा 'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' हा चित्रपटही ऑस्करसाठीच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानला जात आहे. या चित्रपटाला एकूण १० नामांकनं मिळाली आहेत. 



यंदाच्या वर्षी 'गली बॉय' या चित्रपटाची ऑस्करच्या शर्यतीत वर्णी लागली होती. पण, फार काळासाठी हा चित्रपट तग धरु शकला नाही. 'गली बॉय'च्या वाट्याचं यश हुकलं खरं पण, भारताच्या वाट्याला यंदाच्या वर्षी ऑस्कर येण्याच्या आशा अद्यापही पल्लवित आहेत. कारण आहे ते म्हणजे 'द लास्ट कलर' हा चित्रपट. 



वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ


अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटालाही ऑस्करच्या शर्यतीत पाठवण्यात आलं आहे. ज्याची बेस्ट फिचर फिल्म या प्रवर्गात वर्णी लागली आहे. तेव्हा आता अंतिम निकाल पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.