Chhello Show in Oscars : गुजराती चित्रपट 'छेलो शो'ला (Chhello Show) 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये (95th Academy Awards) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर सिनेमा श्रेणीत भारताकडून नामांकन मिळालं आहे. हा सिनेमा तरुणांची स्वप्ने दाखवतो. या सिनेमाचं दिग्दर्शन पान नलिन यांनी केलंय. या सिनेमात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. (95th academy awards gujarati film chhello show is india official entry for oscars 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये 2021 ला या पिक्चरचा प्रीमियर झाला. तसेच ऑक्टोबर 2021 मध्ये छेलो शो या चित्रपटाने 66 व्या वॅलाडोलिड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन स्पाइक जिंकला होता.


इंडीवायरचे डेव्हिड एहरलिच यांनी 'छेलो शो' या सिनेमांचं वर्णन "येत्या पिढीची गोष्ट" अशा शब्दात केलंय. या सिनेमात गुजरातची कथा आहे, जिथे सिनेमातील मुख्य पात्राचं संगोपन झालंय.