मुंबई : 'मजनू' हा मराठी  सिनेमा नुकाताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात भलीमोठी स्टारकास्ट आहे. अभिनेता रोहन पाटील, नितीश चव्हाण, अभिनेत्री श्वेतलाना अहिरे हे कलाकार सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात प्रेक्षकांना फाईट, एक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलंय. पण या सिनेमाच्या टीमसोबत एक मोठा अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४ तासशी बोलताना, या सिनेमातील कलाकार अभिनेता रोहन पाटील याने एक मोठा खुलासा केला आणि म्हणाला की,  ''हा सिनेमा आम्ही खूप संघर्षातून केलाय. शूटींग करत असताना भयंकर किस्से घडले. एक गाण्याचं शूटींग चाललं होतं, नाशिक जिल्ह्यात या सिनेमाचं शूटींग सुरु होतं. बाजूला खूप मोठी दरी होती आणि आमची गाडी तिथून चालली होती. 


पुढे गतिरोधक होतं आणि त्या गतिरोधकला आमच्या ड्राईव्हरने गाडी सावकाश केली. तर मागून एक दिडशेच्या स्पीडने आमच्या गाडीला मागून ठोकलं. या गाडीत मी, श्वेतलाना, नितीश चव्हाण अशी बरीच स्टारकास्ट त्या गाडीत होती. आणि भयंकर मोठा अपघात झाला. गाडी पूर्ण चेपली होती. पण देवाच्या आशिर्वादाने आम्ही सगळे सुखरुप आहोत.''  



इंडियन आयडॉल या शोमधून घराघरात पोहचलेला तसेच 10 व्या इंडियन आयडॉल सीझनचा विजेता असलेला पार्श्वगायक सलमान अलीने 'मजनू' या मराठी सिनेमासाठी प्रथमचं मराठीत पार्श्वगायन केलं आहे. नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.  बऱ्याच ठिकाणी या सिनेमाचे हाऊसफुल्ल बोर्ड पहायला मिळतायेत.