Viral Boy Dancing Video While Cooking Maggie: सध्या सोशल मीडियाव नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ इन्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. खासकरून तरूणाईला आवडतील असे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा धुमाकूळ घालताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ इन्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे यावेळी या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तुम्हाला कधी रात्री कंटाळा आला की मॅगी किंवा काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं ना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरी कोणी नसेल किंवा मित्रांचा ग्रुप असेल तर तुम्ही मस्तपैंकी आपला वेळ हा घरी एन्जॉय करता. सध्या अशाच एका तरूणाचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी या व्हिडीओला सोशल मीडियावरून चिक्कार लाईक्स आले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. तुम्ही असं म्हणाल की नक्की या व्हिडीओमध्ये असं काहीतरी काय? पण हा गमतीशीर व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा.


इन्टाग्रामवर सध्या या व्हिडीओला 49,2M म्हणजे जवळपास 5 कोटी व्ह्यूज आले आहेत. आजकाल तरूण मुलं ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असतात त्यातून त्यांना गमतीशीर व्हिडीओज पाहायला चांगलीच मजा येते. हल्लीची तरूण मुलं ही एकटे राहतात. त्यातून हॉस्टेल नाहीतर पेईंग गेस्ट म्हणून मित्र मैत्रीणींसोबत तसेच रूममेटसोबत एकत्र राहतात. आईवडिलांपासून दूर असल्यानं त्यांना रागवणारं घरी कोणी नसतं. आईवडील जवळ नसल्यानं ते आपल्या मनाचे मुक्त्यार असतात. त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागता येते आणि हवं ते करता येते. त्यामुळे जे हवं ते खाणं पिणं, जेव्हा वाटेल ते करणं अशा अनेक हव्या त्या गोष्टी त्यांना मनाप्रमाणे करता येतात हे खरे परंतु त्याचसोबत सगळी कामं ही एकट्यानं करायची असल्यानं त्यांच्यावर एकप्रकारे जबाबादारीही असते. 


हेही वाचा - काळीमिरी आणि मधाचे एकत्र सेवन केल्यास मिळतील जबरदस्त फायदे


यावेळी एक मुलगा मस्तपैंकी किचनमध्ये मॅगी बनवताना दिसतो आहे. सोबतच मॅगी करता करता हा मुलगा शाहरूखच्या गाण्यावर Dard E Disco या गाण्यावर डान्स करताना दिसतो आहे. तो इतका जोशमध्ये नाचत होता की हे पाहून अक्षरक्ष: आपल्यालाही नाचावसं वाटेल. यावेळी त्याचा हा जोश पाहून त्याच्या रूममेटला त्याचा हा गमतीशीर व्हिडीओ काढायचा मोह आवरता आला नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यानं हा व्हिडीओ चक्क सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. इन्टाग्रामवर @suri__sahab या अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला 4.9 कोटी लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओत म्हटलं की, ''स्ट्रगलर बॉईस. 12 AM एट नाईट''. यावेळी नेटकऱ्यांनी या व्हिडीओला तूफान प्रतिसाद दिला आहे.