Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी. बिग बॉस मराठी सीझन 5 लवकरच सुरु होणार आहे. 28 जुलै रोजी या शोला सुरुवात होणार आहे. या पर्वाची सर्व चाहते अतुरतेने वाट बघत आहेत. कारण बिग बॉस मराठीचा शो हा अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक असणार आहेत. याची सर्वांना आतुरता लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बिग बॉस मराठीकडून एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये बिग बॉसच्या घरात एका खास स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. पहिल्यांदाच एका परदेसी गर्लची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. 


बिग बॉस मराठीमध्ये परदेसी गर्ल 


बिग बॉस मराठी 5 च्या सीझन सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अशातच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये परदेसी गर्लची बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री होणार आहे. लवकरच तिचा बिग बॉसच्या घरातील संघर्ष बघायला मिळणार आहे. 28 जुलै रोजी रात्री 9 वाजता या ग्रँड प्रीमियर कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शुभंकर तावडेचं नाव चर्चेत 


अभिनेता शुभंकर तावडे याने 25 जुलै रोजी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने हा सीझन जरा वेगळा असणार आहे. मी पावसाबद्दल बोलतो आहे की आणखी वेगळे काहीतरी आहे? परंतु जे काही असेल पण मी कुठेतरी नक्की जाणार आहे. असं त्याने म्हटलं आहे. 


मात्र, शुभंकर तावडेच्या पोस्टपूर्वी कलर्स मराठीने देखील एक पोस्ट केली होती. त्यामधून देखील शुभंकरच्या नावाची हिंट मिळाली होती. या पोस्टमध्ये वेड लावणारं प्रेम तर त्याच्याकडून शिकावं, पण हा आहे तरी कोण? अस म्हटलं होतं. त्याचबरोबर या पोस्टला वेड चित्रपटामधील गाणे लावले होते. त्यामुळे देखील त्याची बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा रंगली आहे. 


आतापर्यंतचे विजेते


बिग बॉस मराठीचे याआधी 4 सीझन पार पडले आहेत. यामध्ये पहिली विजेता ही मेघा धाडे झाली होती. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरे विजयी झाला होता. तिसऱ्या पर्वामध्ये विशाल निकम विजयी झाला. तर चौथ्या सीझनमध्ये अक्षय केळकरने आपलं नाव कोरलं होतं. आता बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार. याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.