31 वर्षांनंतरही त्याचं नाव घेताच उडतो थरकाप, मराठीत आजपर्यंत बनला नाही असा भयपट!
मराठी सिनेसृष्टीतील असे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. यामध्ये सर्वात जुने चित्रपट आहेत जे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने बघतात. असाच एक चित्रपट आहे ज्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो म्हणजे महेश कोठारे दिग्दर्शित `झपाटलेला`.
Review : महेश कोठारे दिग्दर्शित मराठी चित्रपट 'झपाटलेला' हा चित्रपट 16 एप्रिल 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडच्या 'चाईल्डस प्ले ' या चित्रपटावरून प्रेरित आहे. 1993 ला प्रदर्शित झाल्यानंतर कालांतराने हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील क्लासिक चित्रपट ठरला. या चित्रपटातील धमाल जोडी म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे.
'झपाटलेला' या चित्रपटाने अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले. या चित्रपटातील 'तात्या विंचू' या पात्राची सर्वात जास्त चर्चा झाली. आजही प्रेक्षक आवर्जून हा चित्रपट बघत असतात. या चित्रपटाला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात बोलक्या बाहुल्याचा प्रयोग पहिल्यांदाच दाखवण्यात आला होता. या चित्रपटात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह किशोरी अंबिये, विजय चव्हाण आणि मधु कांबिकर यांच्या मुख्य भूमिका होत्या.
तात्या विंचू हे नाव कसं पडलं?
दिग्दर्शक महेश कोठारे यांना तात्याविंचू हे नाव इंग्रजी चित्रपट 'रेड स्कॉर्पियन' या चित्रपटातून आणि त्यांच्या मेकअप मॅनचं नाव 'तात्या' यांच्या कॉम्बिनेशनमधून तयार करण्यात आलं होतं. अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या भेटीला आला संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता खलनायक 'तात्याविंचू'. आज देखील या नावाची सर्व प्रेक्षकांमध्ये दहशत आहे. हा चित्रपट खूप हिट ठरला. चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली. त्यानंतर 'झपाटलेला' या मराठी चित्रपटाची सर्वत्र क्रेझ निर्माण झाली.
'झपाटलेला' चित्रपटाला 31 वर्षे पूर्ण
या चित्रपटातील तात्या विंचू या पात्राचे नाव जरी घेतले तरी अजूनही प्रेक्षकांमध्ये भीती निर्माण होते. चित्रपटातील बाहुला हा खरचं बोलत असल्यासारखा वाटत होते. आज देखील या चित्रपटाली तात्या विंचूचा बसला लटकून प्रवास करतानाचा सीन प्रेक्षकांना खूप आवडतो. या चित्रपटातील लक्ष्या आणि तात्या विंचू हे पात्र अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. या चित्रपटाला 31 वर्षे पूर्ण झाली आहेत.