मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याची कार ही एखाद्या घरातील व्यक्तीप्रमाणे असते. अशीच एक नवी कोरी कार अभिनेता आस्ताद काळेने घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. आस्तादने आपल्या नव्या कारसोबत संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. आस्तदने ह्युंदाईची वरणा ही कार खरेदी केली आहे. काळ्या रंगाची ही कार आणि आस्तादचं संपूर्ण कुटुंब एका कॅमेऱ्यात कैद आहे. 



आपल्याला माहितच आहे. आस्तादने एका कार्यक्रमात स्वप्नाली पाटील हिच्यासोबत आपलं खास नातं असल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे या फॅमिली फोटोतही स्वप्नाली पाटील असल्याचं दिसत आहे. तसेच आस्तादने काही दिवसांपूर्वी आपला #NewLook या हॅशटॅगखाली फोटो शेअर केला होता. त्यामध्ये आस्तादने मस्त शेव करून नवा लूक चाहत्यांसमोर आणला होता. आता त्यानंतर गाडी अशी दोन सरप्राईज आस्तादने चाहत्यांना दिलं आहे. आता आस्तादचं तिसरं सरप्राईज काय असणार याकडे चाहत्यांच लक्ष लागून राहिलं आहे?