हिवाळ्यात रात्री पायात मोजे घालून झोपणं चांगलं की वाईट? 99 टक्के लोक करतात ही चूक

Winter Health Tips : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात जास्त घट झाल्याने अनेकजण गरम कपडे परिधान करतात. रात्री झोपताना पायांना थंडी वाजू नये म्हणून बरेचजण पायात मोजे घालून झोपतात. पण असं करणं योग्य की अयोग्य याबाबत जाणून घेऊयात. 

| Dec 20, 2024, 16:32 PM IST
1/7

थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेण्यासाठी अनेकजण रात्रीच्यावेळी स्वेटर, हातमोजे, पायमोजे घालून झोपतात. यामुळे शरीराला उब मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते. हळूहळू त्यांना मोजे घालून झोपण्याची सवयच लागते, परंतु ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. 

2/7

रात्री पायात मोजे घालून झोपल्याने शरीराला नुकसान पोहोचू शकते. रात्री मोजे घालून झोपल्याने शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे अस्वस्थता येते, ब्लड प्रेशर कमी होण्याची समस्या जाणवते.  

3/7

रात्री झोपताना जास्त घट्ट मोजे घातल्याने ब्लड सर्क्युलेशन बिघडू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लोक जास्त वेळ मोजे घालतात, त्यांच्या नसांवर दबाव येतो आणि त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

4/7

रात्रभर पायमोजे घालून झोपल्याने त्वचेला इंफेक्शन होऊ शकते. तसेच त्वचेसंबंधित विविध समस्या निर्माण होऊ शकतात.   

5/7

रात्रीच्यावेळी घट्ट मोजे घालून झोपल्याने पायांच्या नसांवर दाब पडतो ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. म्हणून रात्री झोपताना मोजे घालून झोपणे टाळावे. 

6/7

हिवाळ्यात पायमोजे घालून झोपण्याचे जसे तोटे आहेत तसेच काही फायदे देखील आहेत. हिवाळ्यात मोजे घालून झोपल्याने पायांची त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होतो तसेच टाचांना भेगा पडण्यापासूनही आराम मिळतो. मोजे घातल्याने पाय उबदार राहतात.   

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण अधिक माहितीसाठी  डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)