मुंबईः संगीताचा बाहशाह ए.आर.रेहमान यांच्या मुलीचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं. खुद्द रेहमान यांनी एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ए.आर.रेहमान यांची मुलगी खतिजा आणि रियासदीन यांनी लग्न केलं आहे. लग्नानंतर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र खातिजाच्या लग्नाची चर्चा रंगलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिब्रिटींपासून ते चाहते खातिजाला शुभेच्छा देत आहेत.  नुकतेच खातिजाचे काही न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये खातिजाची खास स्टाइल पाहायला मिळत आहे.



खतिजा आणि रियासदीन यांची डिसेंबर 2021 मध्ये एंगेजमेंट झाली होती. खुद्द खतिजाने इन्स्टाग्रामवर ही बातमी दिली होती. रेहमान यांची मुलगी खतिजा ही सुद्धा एक गायिका आहे. 


तामिळ सिनेमातील अनेक सिनेमांमध्ये तिनं गाणी गायली आहेत. तर रियासदीन हा साऊंड इंजिनियर असून गेली अनेक वर्ष तोरेहमान यांच्यासोबतच काम करत आहे.