एआर रहमान यांनी आयोजित केलं कीर्तन! दुबईतल्या घरात `हरे राम, हरे कृष्ण`चा जयघोष
A R Rahman Hosts Kirtan at home : ए आर रहमान यांच्या घरी किर्तनाचे आयोजन, व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
A R Rahman Hosts Kirtan at home : प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि संगीतकार ए आर रहमान यांना कोणत्याही नवीन परिचयाची गरज नाही. ए आर रहमान यांच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. तुम्हाला माहीत असेलच की, ए आर रहमान नुकताच चर्चेत आला आहे. त्यामागचं कारण त्यांची गाणी नसून एक व्हायरल व्हिडीओ आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे नक्की असं कारण
ए आर रहमान यांच्या दुबईतील घरातील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ए.आर. रहमान यांच्या घरी भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये ए आर रहमान 'हरे रामा हरे कृष्णा' च्या सुरात डोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ए आर रहमान दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत इस्कॉन मंदिरातील एक गट हार्मोनियम आणि मंजिरा यांसारख्या वाद्यांसह भक्तिगीते सादर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ए आर रहमान हे हसत आहे, त्या धूनवर डोलत आहेत. हे संपूर्ण व्हिडीओत रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
यातही लक्षवेधी गोष्ट म्हणजे, अनेक वर्षांपूर्वी ए आर रहमानने धर्मांतर करत हिंदू धर्मातून इस्लाम धर्म स्विकारला. तेव्हा पासून ते एक मुस्लिम म्हणून वावरतात. इतकंच नाही तर एक मुस्लिम असून त्यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या या भजनाच्या कार्यक्रमानं अनेकांना आनंद झाला आहे.
धर्मांतरणापूर्वी ए आर रहमान यांचे नाव दिलीप कुमार असे होते. मात्र, कालांतराने ए आर रहमान यांनी धर्म बदलला. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा त्यांची बहीण गंभीर आजारी होती, तेव्हा त्यांचा कुटूंबानी एका दर्ग्यामध्ये भेट दिली आणि तिचा तब्येतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर ती बरी झाली आणि त्यांच्या कुटुंबानं इस्लाम धर्म स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले नाव दिलीप कुमारवरून बदलून अल्लाह राखा रहमान ठेवले.
हेही वाचा : सलमान, शाहरुखचं नाव पण नाही; कियारा अडवाणी Top Trending सेलिब्रिटी!
ए आर रहमान यांनी धर्म परिवर्तन केले असले तरी कोणी त्यांचा विरोध केला नाही. त्यांच्या कुटुंबाच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी सांगितले की तो पर्यंत संपूर्ण कुटुंबातील लोक हे कमावू लागले होते. कोणी कोणावर अवलंबून नव्हतं. तर ए आर रहमान यांना त्यांचं आधीचं नावं म्हणजेच दिलीप कुमार हे मुळीच आवडत नव्हतं. याचा खुलासा त्यांनी स्वत: एका मुलाखतीत केला होता. याशिवाय त्यांना ते नाव शोभत नव्हतं असं देखील त्यांनी सांगितलं होतं.