मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढाता फैलाव पाहता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. परिणामी हातावर पोट असलेल्या कामरागांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र समोर येत आहे. हाती काम आणि उपासमारीमुळे कामगारांनी पायी आपल्या गावची वाट धरली. या मजुरांना आपल्या राज्यात परत पाठवण्यासाठी अभिनेता सोनु सुदने फार मोठे योगदान दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर मजुरांना केलेल्या मदतीमुळे बिहारमधील सिवान येथे सोनूचा चक्क पुतळा उभा करणार असल्याची चर्चा रंगत आहे. प्रफुल्ल कुमार नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 'बिहारच्या सिवान जिल्हातील जनता तुमची मुर्ती उभारण्याच्या तयारीत आहेत.' असं ट्विट प्रफुल्लने केलं आहे. 


तर या ट्विटवर सोनु सुदने  रीट्विट केले आहे. माझ्या मुर्तीवर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशांचा वापर गरीबांची मदत करण्यासाठी करा.” अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात आधीदेखील सोनू सूदने मदत केली होती. कोरोना योद्धांना जुहू येतील हॉटेल राहण्यासाठी दिलं होतं. एवढंच नाही तर त्यांने लॉकडाऊनमध्ये गरीब-गरजूंच्या मदतीसाठी अन्न वाटपही केलं होतं.