`कपिल शर्मा शो`मधील अभिनेत्यावर वाईट दिवस, रस्त्याच्या कडेला विकतोय द्राक्षे, व्हिडीओ व्हायरल
`द कपिल शर्मा शो` मधील सुप्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडीमन रस्त्याच्या कडेला द्राक्षे विकतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अभिनेत्याची ही अवस्था पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. पाहा काय आहे प्रकरण?
The Kapil Sharma Show : मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी सामान्य लोकांचे तर कधी प्रसिद्ध कलाकारांचे व्हिडीओ असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये 'द कपिल शर्मा शो' मधील एक प्रसिद्ध कलाकार हा रस्त्याच्या कडेला बसून द्राक्षे विकताना दिसत आहे.
'द कपिल शर्मा शो' मधील अभिनेत्याचा द्राक्षे विकतानाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोण आहे हा अभिनेता?
'द कपिल शर्मा शो' मधील कॉमेडियन आणि अभिनेता अली असगर. अली असगर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. 'द कपिल शर्मा शो' मधून त्याने खास ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, सध्या तो अली आता रस्त्याच्या कडेला द्राक्षे विकाताना दिसत आहे. लोक देखील द्राक्षे घेताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
अली असगरवर खरच असे दिवस आले आहेत का? व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय? प्रत्यक्षात असे काहीच झालेले नाही. अली असगरने हे केवळ त्याच्या चाहत्यांसाठी आणि मनोरंजन करण्यासाठी केलं आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ पाहून त्याची द्राक्षे विकण्याची स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली आहे.
स्वत: शेअर केला व्हिडीओ
अली असगरने स्वत: त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता रस्त्याच्या कडेला बसून द्राक्षे विकताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ सौदी अरेबियातील असल्याचं म्हटलं जात आहे. कारण व्हिडीओमध्ये अली 'दस रियाल' म्हणताना दिसत आहे. रियाल हे सौदी अरेबियाचे चलन आहे.
... थोडे आंबट, थोडे गोड
अलीने हा व्हिडीओ शेअर करताना त्याला 10 riyal ..10 riyal … thoda khatta thoda Meetha असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी देखील त्याच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.