मुंबई : वरूण धवन याच्या आगामी ‘जुडवा २’ या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘आ तो सही’ असे या गण्याचे बोल असून हे गाणं नेहा कक्कर आणि मीत ब्रदर्सनी गायलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’ या सिनेमाने प्रेक्षकांना चांगलंच हसवलं होतं. त्यानंतर या सिनेमाचा सिक्वल ‘जुडवा २’ येतो आहे. यात वरूण धवन याची मुख्य भूमिका असून जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या वरूण डबल रोल साकारतो आहे. 



‘जुडवा’ सिनेमातील गाण्यांप्रमाणेच या सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंत मिळत आजे. ‘आ तो सही’ या गाण्यात तापसी पन्नू आणि जॅकलिन यांचा ग्लॅमरस तडका बघायला मिळत आहे. येत्या २९ सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.