Aadesh Bandekar Emotional Video: आज 5 नोव्हेंबर, मराठी रंगभूमी दिनानिमित्तनं सोशल मीडियावर नाट्यरसिक आणि रंगकर्मी हे रंगभुमीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. यावेळी आदेश बांदेकर यांच्या एका पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या त्यांच्या या भावूक पोस्टनं सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. आदेश बांदेकरांचे महाराष्ट्रभर अनेक चाहते आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून ते घरोघरी लोकप्रिय आहेत. या कार्यक्रमाला 20 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रभर दौरा केला आहे. यादरम्यान त्यांना अनेक माणसं भेटली आहेत आणि त्यांनी ती जोडलीही आहेत. यावेळी त्यांनी त्यांना भेटलेल्या अशाच एका जिवलग मित्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी सोलापुर-मुंबई प्रवास करताना त्यांना एक रंगकर्मी भेटले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक भावूक प्रसंग सांगितला आहे. ज्यामुळे त्यांची बरीच चर्चा ही रंगलेली आहे. हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवरही व्हायरल होतो आहे. यावेळी या व्हिडीओ आदेश बांदेकर यांच्यासोबत रंगकर्मी गुरू वठारे होते. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, सोलापूर मुंबई प्रवासात ट्रेनमधे नाट्यव्यवस्थापक आणि मित्र गुरू वठारे यांची अचानक भेट झाली ..गुरू वठारे यांनी रंगभूमीदिनामित्त व्यक्त केलेल्या भावना. ''रंगभूमीदिनाच्या शुभेच्छा''. त्यांच्या या व्हिडीओखाली चाहतेही कमेंट करताना दिसत आहेत. 


या व्हिडीओत गुरू वठारे म्हणाले की, ''2015 साली राज्यनाट्य स्पर्धा ठाणे केंद्रासाठी मी परिक्षक होतो. तेव्हा मी ठाणे केंद्रातील नाट्यगृहात 15 नाटकं पाहिली. सोळाव्या नाटकाच्या मध्यंतरामध्ये मला अर्धांगवायूचा झटका आला. डावी बाजू माझी पूर्ण गेली होती. माझे मित्र सोलापूरचे प्रशांत बडवे यांनी ठाण्याला आदेश दादांना फोन केला की तुम्ही काहीतरी करा आणि गुरूला जाऊन भेटा. डॉक्टर कोण आहेत हेही पाहा. त्यांना योग्य उपचार द्यायला सांगा. तेव्हा आदेश दादा शिवसेना कार्यालयात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मीटिंगला बसले होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिथून उठून ते तातडीने क्रिटिकेअर हॉस्पिटल, ठाणे येथे आले आणि त्यांनी डॉ. राठींची भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांशी माझ्याबाबतीत सांगून योग्य उपचार देण्याबाबत चर्चा केली. आदेश दादांमुळे आजही मी प्रवास करतोयय. अजूनही नाटक जगतोय. आज मी दुपारी भरत जाधव यांचे नाटक पाहण्यासाठी दादरला वंदे भारतने जातो आहे. 'अस्तित्व' नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मी बघण्यासाठी जातोय आणि ही सगळी कृपा आदेश दादांची आहे.'', असं ते म्हणाले.