मुंबई : कौटुंबीक व्यापातून, पतीकडून मिळालेल्या विश्वासघातातून अरुंधती सावरत असतानाच तिच्या वाट्याला आलेली वादळंच काही थांबतना दिसत नाहीत. एकिकडे पतीच्या मनात असणारी भीती आणि दुसरीकडे मनोमन अरुंधतीवर प्रेम करणारा आशुतोष या दोघांमध्येही अरुंधतीच्या मनातील घालमेल प्रेक्षकांना अस्वस्थ करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरूंधती आपलं स्वतःचं असं एकटीचं वेगळं विश्व निर्माण करत आहे. तिच्या या विश्वासात तिची मोचकी जवळची माणसं सोबत असल्याचा तिला आनंद आहे. 


नवं गाणं, संगीत विद्यालय आणि आश्रम या सगळ्यात अरूंधतीने स्वतःला वाहून घेतलं आहे. अशातच अरूंधतीच्या घरी मध्यरात्री अचानक कुणी तरी येतं? 



अरूंधती बेडरूममध्ये झोपली असताना कुणीतरी बाहेर असल्याचा भास होतो. एवढंच नाही तर किचनमधून भांड्यांचा आवाज देखील येतो. 


अरूंधती घाबरत यशला फोन करते. यश घरी येतो. दार उघडताच अरूंधती यशला बिलगते. घरात कुणी तरी असल्याचा भास देखील यशला होतो. आणि तेवढ्यात या दोघांना सोफ्या मागे अनिरूद्ध लपलेला दिसतो.
 
घटस्फोट घेतल्यानंतरही अनिरूद्ध अरूंधतीला त्रास देणं सोडत नाहीत. घाणेरडे आरोप केल्यानंतर अरूंधती 'समृद्धी' बंगला सोडतं. पण तेही अनिरूद्धला पटत नाही.


अरूंधती आणि आशुतोषचं काही तरी प्रकरण सुरू असल्याची भीती त्याच्या मनातून जात नाही. याच भीतीपोटी अनिरूद्ध अरूंधतीच्या घरी मध्यरात्री घुसतो.