मुंबई : स्टार प्रवाहावरील  'आई कुठे काय करते' मालिका ही प्रत्येकीला आपली वाटते. मालिकेतील अरूंधतीमध्ये प्रत्येक महिला स्वतःला शोधत असते. अरूंधतीचा प्रवास हा प्रत्येकीला आपला प्रवास वाटतो. तिची सुख-दुःख ही त्यांना आपली वाटतात. पण गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ अरूंधती साकारणाऱ्या अभिनेत्रीला म्हणजे मधुराणी प्रभुळकर गोखले हीला नेमकं काय दिलं? ते पण महत्वाचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री मधुराणीने महिला दिनानिमित्त एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत मधुराणीने अंरूधतीने तिला काय दिलं, यावर भरभरून बोलत आहे. 


अरूंधतीने काय म्हटलंय


आज अरुंधती महाराष्ट्रातल्या असंख्य स्त्रियांसाठी, लेकींसाठी प्रेरणा स्थान झालेय. मला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्त्रिया येऊन भेटतात तेव्हा त्या प्रत्येकीला गहिवरून आलेलं मी पाहते. प्रत्येकजण अरुंधतीच्या प्रवासात कुठेतरी स्वतः ला पाहत असते.


अरुंधती साकारताना, तिच्या ह्या प्रवासाने मला म्हणजे मधुराणी ला बरंच काही शिकवलंय.... आणि ह्याचं श्रेय जातं ह्या अरुंधतीला उभं करणाऱ्या आमच्या सशक्त आणि प्रगल्भ लेखिका नमिता वर्तक आणि मुग्धा गोडबोल.


ह्या अरुंधतीला दिशा देणारे आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर. ह्या तिघांनी अक्षरशः बोटाला धरून प्रत्येक वळणावर मला अरुंधतीपर्यंत पोहचवलंय ... ती ह्या तिघांची आहे . मी केवळ तिचं रूप आहे.  



मधुराणी अनेकदा अरूंधतीच्या प्रवासावर भरभरून बोलते. हा प्रवास खडतर आहे. पण अनिरूद्धसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. अरूंधती आता सक्षम झाली आहे. ती स्वतःची वाट स्वतः चाचपडत आहे.