मुंबई : स्टार प्रवाहावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका आणि त्यातील पात्र हे प्रेक्षकांच्या पसंतीचे आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र आता या मालिकेतील एका कलाकाराने मालिका सोडली आहे. (Aai Kuthe Kai Karte fame actress left serial she got opportunity New Serial ) मालिकेतील ही दुसरी व्यक्ती आहे ज्यांना मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आई कुठे काय करते' या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागरने एक्झिट घेतली. यानंतर आता अरूंधतीच्या अगदी जवळ असलेल्या विमलने मालिकेचा निरोप घेतला आहे. 



मालिकेत विमलची भूमिका साकारणारी अभिनेत्री सीमा घोगले हीने मालिका सोडली आहे. विमलने आपल्या भाषेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मात्र आता ती मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 


सोनी मराठीवरील 'बॉस माझी लाडाची' ही नवी मालिका २८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत सीमा घोगले मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 



'बॉस माझी लाडाची' या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री लिमये (bhagyashree limaye), रोहिणी हटंगडी, (rohini hattangady) गिरीश ओक, (girish oak) आणि आयुष संजीव (ayush sanjiv) हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यासोबतच सीमा घोगले आणि सोनल पवार यांची देखील या मालिकेत महत्त्वाची भूमिका आहे.