Milind Gawali Advise: लग्नासाठी मिलिंद गवळीचा मुलींना मोलाचा सल्ला; पोस्ट शेअर करत म्हणाला, ``एक बाप म्हणून...``
Milind Gawali Advise: सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते ती म्हणजे `आई कुठे काय करते` (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेची. मिलिंद गवळी आणि मधूराणी प्रभुलकर यांचेही इन्टाग्रामवर असंख्य फॉलोवर्स आहेत. अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali Post on Marriage) हा इन्टाग्रामवर सक्रिय असतो. सध्या त्याची अशीच एक पोस्ट (Viral Post) प्रचंड गाजते आहे.
Milind Gawali Instagram Post: 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे घरातघरात पोहचलेला अभिनेता मिलिंद गवळी यानं (Milind Gawali Advise for Girls on Marriage) इन्टाग्रामवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट विशेष चर्चेत आहे. मिलिंद गवळी हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या इन्टाग्राम हॅण्डलवरून तो अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. गेली 4 वर्षे 'आई कुठे काय करते' ही मालिका सुरू आहे. तेव्हा अनिरूद्ध म्हणून प्रत्येक घरात (Milind Gawali Emotional Post) असणाऱ्या अशाच एका हळव्या बापाची प्रतिमाही त्यानं या पोस्टमधून मांडली आहे. आपल्या मुलांच्या प्रती असणारी काळजी काय असते यावर त्यानं भाष्य केले आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या येणाऱ्या भागातील एक प्रसंग त्यानं सोशल मीडिया हॅन्डलवरून शेअर केला आहे तेव्हा यामध्ये त्यानं कॅप्शनमधून लिहिलेल्या त्या सल्ल्यांतून तरूण मुलींना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेत सध्या अनिरूद्धच्या मुलीला म्हणजेच ईशाला अनिश मागणी घालताना दिसतो आहे परंतु त्यासाठी अनिरूद्ध विरोध करतोय. याच धर्तीवर मिलिंद गवळी (Milind Gawali Daughter) तरूण मुलींना काहीतरी महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न या पोस्टमधून करतो आहे.
काय लिहिलंय मिलिंदनं पोस्टमध्ये?
“एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडली जात आहे, अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे.पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे, अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही , ती तिचं शिक्षण पूर्ण करत नाही , तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही , तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं नाही.
बाप म्हणून त्याला त्याची मुलगी खूप चांगली माहिती आहे, दोन वेळा ती प्रेमात फसली आहे, आता त्याचा तिच्या या प्रेमावर विश्वास नाही, त्याचं म्हणणं आहे की साखरपुडा झाल्यानंतर कशावरून यश आणि गौरी सारखा तिचाही साखरपुडा मोडणार नाही, त्याचं म्हणणं आहे की आधी शिक्षण पूर्ण करा, आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे रहा, आणि मगच हा लग्नाचा विचार करा, अनिरूद्ध असेही म्हणतो की , मुलगा पण अजूनही सेटल झालेला नाही , तोही अजूनही शिकतो आहे, मग एवढ धाई कशासाठी, अनिरुद्ध बाप म्हणून कुठेही चुकत नाही आहे कदाचित त्याची ही समजावण्याची पद्धत खूप चुकीची आहे.
पण ती अनिरुद्ध ची पद्धत आहे , तो वेगळा वागूच शकत नाही वेगळ्या पद्धतीने अनिरुद्ध समजावू शकत नाही. मुलीवर अतोनात प्रेम करणारा , तिच्यावर जीव लावणारा , तिच्यासाठी खूप मोठी स्वप्न बघणारा हा अनिरुद्ध आता पुढे काय करतोय, हे बघायला खूपच मजा येणार आहे. पुढचे सीन्स मी शूट केलेले आहेत, जे मला स्वतःला खूप भावले आहेत , पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाही”
पाहा व्हिडीओ
मागेही अशाच एका एपिसोडमधून मिलिंद गवळींनं (Milind Gawali in Upcoming Episode) अशी एक भावनिक व्यथा मालिकेतून मांडली होती ज्यातही मिलिंदच्या अभिनयानं आणि संवादानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या एपिसोडनंतर मिलिंदचे सोशल मीडियावरून प्रेक्षकांकडून कौतुक झाले होते.
मिलिंद गवळीनं आतापर्यंत अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांमधून महत्त्वाच्या भुमिका निभावल्या आहेत. 20 वर्षाहून अधिक काळ तो मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील त्याची अनिरूद्ध ही भुमिका विशेष गाजली आहे. त्याआधीही त्यानं 'गहिरे पाणी', 'सारे तुझ्याचसाठी', 'कॅम्पस' अशा लोकप्रिय मालिकांमधून (Milind Gawali Serials) अभिनय केला आहे. त्याच्या अनेक भुमिकाही गाजल्या आहेत.