नवरात्रीत खा 'या' शाकाहारी गोष्टी, शरीरात जाणवणार नाही प्रोटीनची कमतरता

Oct 06, 2024, 21:58 PM IST
1/7

नवरात्रीत खा 'या' शाकाहारी गोष्टी, शरीरात जाणवणार नाही प्रोटीनची कमतरता

2/7

प्रोटीन म्हंटल की मांसाहारी पदार्थ डोळ्यासमोर येतात. परंतु असेही काही शाकाहारी पदार्थ आहेत जे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. चला जाणून घेऊयात प्रोटीनचे शाकाहारी स्त्रोत कोणते आहेत.

3/7

सोया आहे उत्तम स्रोत

शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी सोयाबीन उत्तम पर्याय आहे. तुम्ही सोयापासून बनवलेली भाजी खाऊ शकता. सोया मिल्क हा पण एक उत्तम स्रोत आहे.   

4/7

दुग्धजन्य पदार्थ

आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. पनीर, चीज देखील खायला खूप चविष्ट लागते. याशिवाय एक वाटी दही हा प्रोटीनसाठी चांगला पर्याय आहे.

5/7

नट्स

प्रोटीनची पूरतता  करण्यासाठी, तुम्ही दररोज सकाळी काही भिजवलेले बदाम, ब्राझील नट्स, शेंगदाणे आणि ब्राझील नट्स खाऊ शकता.

6/7

डाळी आणि शेंगा

प्रोटीनसाठी डाळी आणि शेंगा यांचा आहारात समावेश केला पाहिजे. मूग डाळ, काळे हरभरे इत्यादींचे मोड तयार करून खाऊ शकतात. 

7/7

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)