मुंबई : 'मला मालिकेतून काढले नाही, मीच मालिका सोडली. तसेच मला सेटवर विवेक सांगळे यांच्याकडून शिवीगाळ झाली,' असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड भावूक झाली आहे. 'आई माझी काळूबाई' या मालिकेतील वाद संपायचं काही नावच घेत नाही. आज या मालिकेतील आर्या पात्र साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने पत्रकार परिषद घेतली. यामधून तिने आपली बाजू मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेच्या सेटवर माझ्या आईबद्दल अपशब्द काढले गेले. तसेच सेटवर मला शिवीगाळ करण्यात आली. तुमच्या मुलींसोबत असे काही झाले असते तर अलका ताई अशाच वागल्या असता का? असा सवाल यावेळी प्राजक्ता गायकवाडने मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांना केला आहे. 


मी परीक्षेसाठी सुटी घेणार हे आधीच सांगितले नव्हते. माझ्यामुळे शूटिंग कधी थांबले नाही. मी इव्हेंट ची सुपारी घेते असा आरोप झाला त्यात तथ्य नाही. कारण सध्या कोरोनामुळे इव्हेंट बंद आहेत. तसेच मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. यावरून माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. 


मला रक्त लागलेली साडी दिली गेली, माझ्या आईने त्याविषयी विचारले तर त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटलं गेलं. तसेच अलका ताई माझ्यासाठी आई सारख्या आहेत, मात्र त्या नराधमांना पाठीशी घालताहेत. माझी बदनामी करताहेत. महत्वाची बाब म्हणजे मला या सिरीयलच आतापर्यंत एकही दिवसाचे पेमेंट झालेले नाहीय 


मी एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील 8- 8 / 10-10 तास करतात तेव्हा आमच्या घरात चूल पेटते. असं असताना मला एकही रुपया मिळालेला नाही. उलट मला बदनाम केलं जातं आहे, असा दावा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने केला आहे.