`आज्जीबाई जोरात` नाटकानं गाठली पन्नाशी! तीन महिन्यातच रंगणार सुवर्ण महोत्सवी प्रयोग!
Aajibai Jorat Marathi Play : आजीबाई पन्नाशीत! तीन महिन्यातच गाठला प्रयोगाचा सुवर्ण महोत्सव...
Aajibai Jorat Marathi Play : महाराष्ट्रातील नाट्य रसिकांमध्ये धुमाकूळ घालत असलेलं पहिलं एआय महा बालनाट्य 'आजीबाई जोरात' आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. केवळ तीन महिन्यात या नाटकाचे तब्बल 50 प्रयोग झाले. या नाटकानं प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवर अशा सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. बाल प्रेक्षकांना मराठीची गोडी लावणारं, स्क्रीन मधून बाहेर काढणारं आणि पालकांनाही हवंहवसं वाटणारं हे नाटक आता वेगवेगळ्या शाळा एक उपक्रम म्हणून दाखवू लागल्या आहेत. याशिवाय वेगवेगळ्या महोत्सवांमध्येही नाटकाला जोरदार मागणी आहे.
याबद्दल बोलताना नाटकाचे लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले की, "अनेक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे मराठीतील पहिलं ब्रॉडवे म्युझिकल अशी पावती आम्हाला दिली आहे. अनेक मुलांनी नाटक पाहून मराठी लिहायला वाचायला सुरुवात केली इतकंच नाही तर त्यांनी स्क्रीन टाईम कमी केला. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय अनेक पालक नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी भेटवस्तू, खायचे पदार्थ, पुस्तकं आपुलकीनं घेऊन येतात, त्या प्रेमानंही भारावून जायला होत आहे."
मराठी रंगभूमीची ताकद सर्वदूर पोचावी म्हणून हे नाटक लवकरच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, इतर राज्य आणि देशाबाहेरही न्यायचा आमचा मानस आहे, त्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत.
हेही वाचा : Olympic मध्ये Tom Cruise ला महिलेनं बळजबरी केलं Kiss, 'हेच पुरुषानं केलं असतं तर..?'
या नाटकाचे लेखक हे क्षितीज पटवर्धन या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे. या नाटकाने आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. क्षितीज पटवर्धन याने आतापर्यंत ‘डबल सीट’, ‘फास्टर फेणे’, ‘धुराळा’ अशा प्रसिद्ध चित्रपटांचे लेखन केले आहे. लेखक म्हणून आजवर क्षितीज पटवर्धन याने भरपूर नाव कमावले आहे. त्याने अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या कथा आणि चित्रपटांची गाणी देखील लिहिली आहेत. नाटक, चित्रपट, जाहिराती, कविता, गाणी अशा अनेक माध्यमात लेखन करणारा क्षितीज पटवर्धनचं हे नाटक चांगलंच गाजतंय. जेव्हा क्षितीज पटवर्धननं त्याच्या या नाटकाची घोषणा केली तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक प्रेक्षक वर्गाची आतुरता शिगेला पोहोचवली होती. येत्या 14 आणि 15 ऑगस्ट रोजी या नाटकाचे सुवर्ण महोत्सवी प्रयोग पुण्यामध्ये होणार आहेत.