मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये Casting Couch हा विषय पुन्हा एकदा डोकं वर करत आहे. हॉलिवूडमध्ये हार्वे वेनस्टाइन स्कँडलसमोर आल्यानंतर #MeToo ही चळवळ सुरू आहे. अशा प्रकारच्या कास्टिंग काऊचच्या घटना बॉलिवूडमध्ये देखील घडलेल्या आहेत. काही जण म्हणतात बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच नाही तर काहीजण म्हणतात की कास्टिंग काऊच हा आजार बॉलिवूडला देखील जडला आहे. या प्रश्नावर आलिया भट्टने देखील काही मुद्दे शेअर केलेत. 


काय म्हणाली आलिया भट्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्टने आतापर्यंत कास्टिंग काऊचसारखा प्रॉब्लेम फेस केलेला नाही. मात्र तिने कास्टिंग काऊच हा प्रश्न बॉलिवूडमध्ये सतावत असल्याच सांगितलं आहे. डेक्कन क्रोनिकलसोबत कास्टिंग काऊचबद्दल बोलत असताना आलिया म्हणाली की, मला माहित आहे, अनेकदा युवा पिढीला खूप कठीण प्रंसगाला सामोरे जावे लागते. काम शोधण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल करावा लागतो. यावेळी अनेकजण त्यांच्या या स्ट्रगलच्या काळात फायदा उचलतात. अशावेळी त्यांनी या सगळ्यागोष्टी आपल्या कुटुंबियांशी मनमोकळेपणाने बोलाव्यात असा सल्ला आलियाने दिला आहे. तसेच पोलिसांशीदेखील या गोष्टी स्पष्ट बोलाव्यात असं देखील सांगण्याचा सल्ला तिने दिला आहे. 


आलिया भट्टचा नुकताच राझी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला गाजतो आहे. या सिनेमांत आलिया भट्ट गुप्तहेर मुलीची भूमिका साकारत आहे. विक्की कौशलने आलियासोबत लीड रोल केला असून मेघना गुल्जार या सिनेमाची दिग्दर्शिका आहे.