VIDEO : छोट्या आलियाचा `टिप टिप बरसा पानी`वर डान्स व्हायरल
अभिनेत्री रवीना टंडन हिच्या `टिप टिप बरसा पानी`वर थिरकत आलियानं आपल्या चाहत्यांवर भूरळ पाडलीय
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किडसचा एक नवा अध्याय सुरू आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी, सैफ अली खानची मुलगी सारा यांच्या बॉलिवूडमधल्या धमाकेदार डेब्युनंतर आता आणखीन एक ग्लॅमरस स्टारकिड बॉलिवूड एन्ट्रीसाठी सज्ज आहे. आपण बोलतोय पूजा बेदी हिच्या मुलीबद्दल अर्थात आलिया इब्राहिमबद्दल... आलिया बॉलिवूड पदार्पणापूर्वीच आपल्या सौंदर्यासाठी आणि स्टायलिश लूकसाठी सोशल मीडियावर हीट ठरलीय. सोशल मीडियावर जास्तच अॅक्टिव्ह असणाऱ्या आलियानं आपल्या डान्सचा एक व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. आलियाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
आलियानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. अभिनेत्री रवीना टंडन हिच्या 'टिप टिप बरसा पानी'वर थिरकत आलियानं आपल्या चाहत्यांवर भूरळ पाडलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, आलिया लवकरच सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. हा सिनेमाची निर्मिती छोटे नबाव आणि जय सेवकरमानी करणार आहेत. ही कहानी बापाच्या आणि मुलीच्या नात्यावर आधारलेली असेल. आलिया या सिनेमात सैफच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
आलियाची आई पूजा बेदी हिनं १९९४ मध्ये फरहान फर्निचरवाला याच्यासोबत विवाह केला होता. १९९७ साली आलियाचा जन्म मुंबईत झाला. त्यानंतर मात्र २००३ साली पूजा आणि फरहानचे मार्ग वेगळे झाले. आलिया सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवीचं शिक्षण घेतेय. आलियाला हॉकी, फुटबॉल आणि पोहणं खूपच आवडतं.