मुंबई : अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा 15 वर्षांचा संसार अखेर संपला आहे. शनिवारी आमिर आणि किरण विभक्त झाले. घटस्फोटानंतर आमिर आणि किरण पहिल्यांदा एकत्र आले आणि नात्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली. आमिर आणि किरणने चाहत्यांसाठी  एक व्हिडिओ तयार केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. शिवाय आम्ही आमच्या निर्णयामुळे खुश आहोत असं देखील आमिर आणि किरण म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


व्हिडिओमध्ये आमिर म्हणाला, 'तुम्हाला फार वाईट वाटलं असेल. मोठा धक्का देखील बसला असेल. आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, आम्ही एकमेकांसोबत आहोत. एक कुटुंब आहोत. फक्त आमच्या नात्यात थोडा बदल झाला आहे. पाणी फाऊंडेशन आमच्यासाठी आझादसारखं आहे. आझाद आमचा मुलगा आणि पाणी फाऊंडेशन आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे.  ' 


आमिर आणि किरण दोघे या  व्हिडिओमध्ये एकत्र बसलेले दिसत आहेत. दोघांमध्ये मैत्रीचं नातं आधी जसं होतं तसचं दिसत आहे.  आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. आमिर जेव्हा किरणला भेटला तेव्हा देखील तो रीनाबरोबर होता. आमिरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, रीनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे आणि किरणचे अफेअर सुरु झाले. आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 रोजी एकमेकांशी लग्न केले होते. यानंतर त्यांचा मुलगा आझादचा जन्म सरोगेसीच्या माध्यमातून 2011 मध्ये झाला होता.