मुंबई: एका मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडटचा मिस्टर परफेक्शनिस्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता आमिर खानचा 'कोई जाने ना' सिनेमा 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील 'हरफनमौला' हे गाणं नुकतच रिलीज झालयं. या व्हिडीओत आमिर खान आणि एली अवरामचा रोमांस पाहायला मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतयं.गाण्यात एली अवराम आणि आमिर खान जबरदस्त स्टाईल दिसत आहे. गाण्यात आमिर खान आणि एली अवरामची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे आणि सगळीकडे त्याची चर्चा आहे. 'हरफानमौला' गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.



या शिवाय हे गाणं झारा खान आणि विशाल दादलानी यांनी गायलं आहे. या गाण्याला संगीत तनिष्क बागची यांनी दिलं आहे. हे गाणं आऊट होऊन 2 तासदेखील झाले नाही आणि तब्बल 5 लाखाहून अधिक व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत. आमिर खानचा जबरदस्त डान्स अवतार या गाण्यात पाहायला मिळतोय.


मोठ्या ब्रेकनंतर आमिर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यातच बऱ्याच दिवसांनंतर आमिरचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळाल्याने चाहत्यांकडून त्याच्या या लूकला मोठी पसंती मिळतेय. या गाण्यातील आमिर खानचा लूक त्याने स्वत: सूचवला आहे.


आमिर खान त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रोजेक्टमध्ये सामिल होतो. वेगवेगळ्या कल्पना सूचवत असतो. या गाण्यासाठी देखील सेफी फॉर्मल लूक असावा असं त्यानं दिग्दर्शकाला सुचवलं होतं. अमिर खान वर्षातून एक ते दोन सिनेमे घेवुन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्याच्या सिनेमाला प्रेक्षकदेखील भरभरुन प्रेम देत असतात.


चाहते त्याच्या सिनेमाची वाट पाहत असतात. या सिनेमात अमिर एका वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुकता दर्शवतायेत.आमिर खान सध्या 'लालसिंग चड्ढा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर स्क्रिन शेअर करणार आहे.