Aamir Khan To Get Married With Fatima Sana Shaikh: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असलेल्या एका अभिनेत्याने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसंदर्भात (Aamir Khan) एक मोठा दावा केला आहे.  'दंगल' (Dangal) चित्रपटामध्ये आमिर खानच्या मुलीची म्हणजेच गीता फोगाटची भूमिका साकारलेल्या फातिमा साना शेखचा (Fatima Sana Shaikh) उल्लेख करत हा दावा करण्यात आला आहे. फातिमाने या चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले पण तिची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच या चित्रपटानंतर आमिर खान आणि फातिमाच्या कथित नात्याचीही चर्चा पेज थ्रीवर झाल्याचं पहायला मिळालं. मात्र आता अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खानने (KRK Tweet) हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा केला आहे.


काय म्हणालाय हा अभिनेता?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देशद्रोही' चित्रपटामुळे अगदी सर्वांनाच ठाऊक असलेल्या केआरकेने एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्याने आमिरच्या लग्नासंदर्भातील दावा केला आहे. मात्र हा दावा त्याने कशाच्या आधारावर केला आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. तरीही त्याचं ब्रेकिंग न्यूज या शब्दांसहीत सुरु होणारं ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. "ब्रेकिंग न्यूज - आमिर खान लवकरच आपल्या मुलीच्या वयाच्या फातिमा सना शेखबरोबर लग्न करणार आहे. आमिर खान फातिमाला 'दंगल' चित्रपटापासून डेट करत आहे," असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 



दोनच दिवसांपूर्वी व्हायरल झाले व्हिडीओ आणि फोटो


केआरकेच्या या ट्वीटवर शेकडोंच्या संख्येनं कमेंट्स आल्या आहेत. 150 हून अधिक वेळा हे ट्वीट रिट्वीट करण्यात आलं आहे. तर त्यावर 2 लाखांहून अधिक इम्प्रेशन्स आहेत. तसेच 2 हजारांहून अधिक लाईक्स या ट्वीटला मिळाले आहेत. केआरकेने हे ट्वीट करण्याचं कनेक्शन दोनच दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या आमिर खान आणि फातिमाच्या व्हिडीओ आणि फोटोशी जोडलं जात आहे. यामध्ये दोघेही पिकलबॉल गेम खेळताना कोर्टवर दिसत आहेत.



कोण आहे फातिमा?


फातिमा ही 31 वर्षांची आहे. लहानपणापासूनच ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. तिने आमिर खानसोबतच्या 'दंगल' चित्रपटातून मोठ्या पदड्यावर पदार्पण केलं. या चित्रपटानंतर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटामध्येही आमिर आणि फातिमा एकत्र दिसून आले होते. या दोघांच्या वयामध्ये 27 वर्षांचं अंतर आहे.


2021 ला आमिरने घेतला घटस्फोट


आमिर खान हा 58 वर्षांचा असून त्याला जुनैद आणि इरा नावाची 2 मुलं आहेत. इरा खानची काही दिवसांपूर्वीच एन्गेजमेंट झाली आहे. आमिरने 2021 मध्ये दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आम्ही हा निर्णय एकमताने घेतल्याचं या दोघांनीही घटस्फोट घेत असल्याचं जाहीर करताना म्हटलं होतं. या घटस्फोटानंतर आमिर आणि फातिमाच्या कथित नात्यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या होत्या.