मुंबई : बॉलिवूड परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan)  सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा'च्या  (Lal Singh Chaddha) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आमिरसोबत करिना कपूरही (Kareena kapoor) स्क्रिन शेअर करणार आहे. आता चित्रपटातील करिनाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर एकाने 'लाल सिंह चड्ढा'च्या शूटिंगदरम्यानचे दोन फोटो शेअर केले. या फोटोमध्ये करिना पंजाबी गेटअपमध्ये दिसतेय. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, आमिरचा हा चित्रपट हॉलिवूड स्टार टॉम हॅक्सचा चित्रपट 'Forrest Gump'चा हिंदी रिमेक आहे. ऑस्कर अवॉर्ड जिंकणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे आमिरही आता चित्रपटासाठी चांगलीच मेहनत करताना दिसतोय. 'लाल सिंह चड्ढा' यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


आमिर आणि करिना ही जोडी यापूर्वी 'थ्री इडियट' आणि 'तलाश' चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दोन्ही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाईही केली होती. त्यामुळे पुन्हा 'लाल सिंह चड्ढा'मधून आमिर-करिना जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.