आमीर आणि किरणने का घेतली जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांची भेट?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांनी नुकतीच जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांनी नुकतीच जम्मू -काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि केंद्रशासित प्रदेशाला चित्रपटाच्या शूटिंगसाठी आवडतं ठिकाण बनवण्याबाबत चर्चा केली.
यावेळी आमीर खान यांनी राजभवनात जाऊन उपराज्यपालांची भेट घेतली. या भेटीसंदर्भातील एक ट्विट उपराज्यपालांनी शेअर केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. "आज प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आमीर खान आणि किरण राव यांची भेट झाली."
आम्ही जम्मू - काश्मीरच्या नवीन चित्रपट धोरणांवर चर्चा केली, जे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. यावेळी जम्मू -काश्मीरला पुन्हा एकदा बॉलिवूडमधील शुटींगसाठीच आवडतं ठिकाण बनवण्यावरही चर्चा झाली.