Aamir Khan and Suriya Ghajini 2 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानचा 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'गजनी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाचा लवकरच सीक्वल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वलची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. त्यात आता अशी माहिती समोर आली आहे की निर्माते अल्लू अरविंद आणि मदु मंटेना यांच्यात काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पहिल्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की निर्मात्यांनी आमिरला एक आयड्या दिली आहे. त्यातून काहीही काम करण्याआधी स्टोरीबोर्ड तयार करण्याची विनंती केली आहे. यात अल्लू अरविंद यांनी दाक्षिणात्य अभिनेता सूर्यासोबच तमिळमध्ये 'गजनी 2' बनवण्याचा विचार करत आहेत आणि स्वत: सूर्यानं याविषयी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुार, सूर्यानं आश्चर्य व्यक्त करत सांगितलं की बऱ्याच काळानंतर अल्लू अरविंद हा विचार घेऊन आले आहेत आणि काय हे शक्य आहे का? मी त्यांना म्हटलं सर नक्कीच आपण याविषयी विचार करु शकतो. यावर चर्चा सुरु झाली आहे, या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया सुरु आहे. 'गजनी 2' होऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, ही गोष्ट समोर आली की अल्लू अरविंद आणि मधु मंटेना 'गजनी 2' च्या हिंदी आणि तमिळ दोन्ही व्हर्जनला एकत्र शूट करण्याची इच्छा आहे. एका सूत्रानं दिलेल्या माहिती नुसार, जशा प्रकारे चित्रपट हे पॅन इंडिया प्रेक्षकांना टार्गेट करत आहेत. तसे कल्ट क्लासिकचा रीमेक होणं कठीण होत आहे. 


हेही वाचा : नणंदेला 'चुगलीखोर' का म्हणाली आलिया? तिचं बोलणं ऐकून सगळेच हैराण....


आमिर आणि सूर्या दोघं 'गजनी 2'  ला घेऊन उत्साही आहेत, पण रीमेक म्हणण्यावर घेऊन थोडे चिंतेत आहे. त्याचं कारण म्हणजे एक व्हर्जन, दुसऱ्या व्हर्जनआधी प्रदर्शित व्हायरल नको. जेणे करून दोन्ही चित्रपटांसाठी उत्साह हा कमी व्हायला नको. आमिर आणि सूर्या दोघेही या आगामी प्रोजेक्टला घेऊन उत्साही आहेत. पण त्या आधी म्हणजेच चित्रपट साइन करण्याआधी येणाऱ्या स्क्रिप्टची प्रतीक्षा करत आहेत. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून 2025 च्या मिडपर्यंत फायनल होईल.