`जया बच्चन यांच्यामुळे मत्सर, समस्या...`, KBC मध्ये आमीर खानचा प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन पाहतच राहिले
बॉलिवूड अभितेना आमीर खान (Aamir Khan) आणि त्याचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) यांनी `कौन बनेगा करोडपती 16` (KBC 16) ला हजेरी लावली.
बॉलिवूड अभितेना आमीर खान (Aamir Khan) आणि त्याचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) यांनी 'कौन बनेगा करोडपती 16' ला हजेरी लावली. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्याच्या निमित्ताने आयोजित विशेष एपिसोडमध्ये दोघेगी उपस्थित होते. यावेळी आमीर खानने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना त्यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्याबद्दल एक प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच अमिताभ बच्चन यांना काय बोलावं हे सुचत नव्हतं.
आमीरने जया बच्चन यांच्याबद्दल विचारला प्रश्न
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आगामी सीझनचा प्रोमो यात शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आमीर खानने अमिताभ यांना विचारलं की, "माझ्याकडे तुमच्यासाठी एक सुपर डुपर प्रश्न आहे". यावर अमिताभ बच्चन हा विचारा असं म्हणतात.
यानंतर आमीर खान प्रश्न विचारतो की, "जयाजी जेव्हा दुसऱ्या हिरोसोबत शुटिंगसाठी जात असत, तेव्हा असा कोणता हिरो होता ज्याचं नाव ऐकून तुम्हाला फार त्रास व्हायचा, मत्सर वाटायचा".
आमीरच्या प्रश्नावर अमिताभ यांची प्रतिक्रिया
अमिताभ आमिरकडे आश्चर्याने बघताना आणि नंतर हसताना दिसले. हॉट सीटवर आमीरच्या शेजारी बसलेला जुनैदही यावेळी हसत होता. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमद्ये लिहिण्यात आलं आहे की, "महानायकाच्या जन्मोत्सवाला आमीर खानने जुन्या आठवणी ताज्या केल्या. पाहा #कौन बनेगा करोडपती, 11 ऑक्टोबर, रात्री 9 वाजता, sirf #SonyEntertainmentTelevision. 11 ऑक्टोबरला अमिताभ यांचा 82 वा वाढदिवस आहे.
आमीर खान अमिताभ यांना देणार सरप्राईज
अलीकडेच सोनीने एक प्रोमो शेअर केला ज्यामध्ये आमीर आणि जुनैद अमिताभ यांना केबीसीच्या सेटवर सरप्राईज देणार आहेत. व्हिडिओमध्ये ते त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना आणि सेटवर जाताना दिसत आहेत. त्यानंतर आमिरने कॅमेऱ्यात पाहिलं आणि म्हणाला, “श्श्, आम्ही आज शोमध्ये आहोत हे अमितजींना कळू नये. ते उघड करू नका”.
कौन बनेगा करोडपती हे Who Wants to Be a Millionaire शोचे अधिकृत हिंदी रूपांतर आहे. 2000 मध्ये शो सुरू झाल्यापासून अमिताभ होस्ट आहेत. तिसऱ्या सीझनमध्ये शाहरुख खानने त्यांची जागा घेतली. केबीसी 16 सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्ह ॲपवर प्रसारित होते.