मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारा आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.  सुपरस्टार आमिर खान त्याच्या बिंधास्त स्टाईलसाठई ओळखला जातो. अलीकडे घटस्फोटामुळे चर्चेत असलेला आमिर पुन्हा एकदा त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने खुलासा केला आहे की, कसा त्याने त्याच्या आयुष्यात संघर्ष केला आहे. या मुलाखतीत त्याने आपल्या परिवारासोबतच्या वाईट दिवसांची आठवण करत सांगितलं की, जेव्हा तो १० वर्षांचा होता तेव्हा त्याला खूप वाईट दिवसांचा सामना करावा लागला होता. 


आमिर खानने या मुलाखतीत सांगितलं की, 'मला अब्बाजानला असं बघून खूप त्रास व्हायचा कारण ते खूप साधा माणूस होते. कदाचित ते या गोष्टीला समजू शकले नव्हते की, त्यांनी ऐवढं कर्ज घ्यायला नको होतं. आमिर खान म्हणाला की, अनेक वेळा चित्रपटाची तिकिटे ब्लॅकमध्ये विकली गेली, त्यामुळे निर्मात्यांना त्यांचे पूर्ण पैसे मिळत नव्हते.


आमिर खानने पुढे सांगितलं की, 'त्याच्या वडिलांचे काही चित्रपटांसाठी यशस्वी झाले होते, पण त्यांच्याकडे कधीच पैसे उरले नाही. त्यांना अडचणीत पाहणं माझ्यासाठी खूप वेदनादायक होतं कारण ज्या लोकांकडून त्यांनी पैसे घेतले होते त्यांचे फोन सतत त्यांना यायचे तेव्हा मला समजायचं नाही की, मी काय करू?  फोनवर त्यांची भांडणे सुरू असायची. माझे बाबा फोनवर म्हणायचे माझ्याकडे पैसे नाहीत. माझा चित्रपट अडकला आहे, माझ्या कलाकारांना सांगा की मला डेट्स द्या, मी काय करू.'


आमिर खानने पुढे सांगितलं की, या सगळ्या टेन्शनमध्ये मात्र त्यांच्या वडिलांनी मात्र त्यांच्या शाळेची फी देण्यासाठी कधी उशिर केला नाही. त्याने हेही सांगितलं की, त्याची आई त्याच्यासाठी थोडी मोठी पॅन्ट कशी आणायची. आम्ही ती पँन्ट फोल्ड करुन वापरायचो जेणेकरून ती पँन्ट बराच काळ घालता येईल. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आमिर खानचा लाल सिंह चड्ढा या वर्षी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरला.