गरीबांचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' मेट्रो शहरात 5.35 लाखामध्ये मिळतेय घर, जाणून घ्या सविस्तर

सध्या घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत एक नवीन योजना आली आहे. ज्यामध्ये तुम्ही स्वस्त घर खरेदी करू शकता. जाणून घ्या सविस्तर

| Oct 05, 2024, 17:53 PM IST
1/7

किंमत

गाजियाबादमध्ये EWS आणि LIG कुटुंबांसाठी परवडणाऱ्या घरांची योजना आली आहे. EWS घरांची किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरु होते. तर LIG घराची किंमत 12.58 लाख रुपयांपासून सुरु होते. 

2/7

ठिकाण

दिल्लीहून मेरठ एक्सप्रेसवेवर जात असताना यूपी गेटजवळ सिद्धार्थ विहार हे ठिकाण आहे. प्रतीक शहर आहे. येथे प्रतीक ग्रुपने 'प्रतीक ऑरेलिया' हा नवीन प्रकल्प सुरु केला आहे. 

3/7

प्लॅटची किंमत

दिल्ली एनसीआरमध्ये दोन बेडरुमच्या प्लॅटची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र, या प्रकल्पात एक बेडरुमचा प्लॅट 5.5 ते 12.5 लाख रुपयांना मिळणार आहे. 

4/7

सुविधा

या प्रकल्पात LIG आणि EWS ला 1BHK घरे मिळणार आहेत. ज्यामध्ये दुचाकी पार्किंग, वृद्धांसाठी बसण्याची जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची जागा असणार आहे. 

5/7

प्रमुख ठिकाण

सिद्धार्थ विहार कॉलनीतून दिल्लीच्या प्रमुख ठिकाणी सहज पोहोचता येते. मेट्रो, रेल्वे स्टेशन आणि विमानतळ जवळच असल्यामुळे वाहतूक अतिशय सोयीची आहे. 

6/7

शेवटची तारीख

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून नोंदणी सुरु झाली आहे. EWS साठी 25 हजार रुपये आणि LIG साठी 60 हजार रुपये जमा करावे लागतील. शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे. 

7/7

नोंदणी फॉर्म

सिद्धार्थ विहारमधील प्रतीक ग्रुप ऑफिस आणि गाझियाबाद आणि एनसीआरमधील HDFC बँकेच्या काही शाखांमधून नोंदणी फॉर्म तुम्ही घेऊ शकता. यासाठी उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे.