Ira Khan Engagement : इरा खानने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा, फोटो आले समोर
बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खानचा (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपूडा पार पडला आहे.मुंबईत या संबंधित कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात आमिरचे अनेक जवळचे मित्र आणि कुटूंब उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aamir khan daughter ira khan engagement with nupur shikare photo viral nz)
Ira Khan Engagement : बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खानचा (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपूडा पार पडला आहे.मुंबईत या संबंधित कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात आमिरचे अनेक जवळचे मित्र आणि कुटूंब उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aamir khan daughter ira khan engagement with nupur shikare photo viral nz)
इरा खान आणि नुपूर शिखरेचा आज मुंबईत साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक पाहूणे उपस्थित होते.
या खास सोहळ्याला इराचे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते. वडील आमिर खान, आई रीना दत्ता (Reena Dutta), आजी, भाऊ आणि काकू व्यतिरिक्त, किरण राव (Kiran Rao) या खास प्रसंगी दिसले.
आमिर खानच्या लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पांढऱ्या रंगाच्या धोती कुर्त्यात आलेल्या आमिरची पांढरी दाढी आणि केस पाहून सगळेच थक्क झाले.
तिच्या आयुष्यातील या खास प्रसंगी, इरा एका लाल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. इरा ऑफ-शोल्डर गाउनमध्ये ग्लॅमरस (glamorous) दिसत होती, तर नुपूर शिखरे देखील टक्सिडो परिधान केलेल्या देखणा दिसत होता.