मुंबई : अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्या नात्याच्या वावटळी दर दिवसाआड उठत आहेत. अद्यापहीत याबाबत कोतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परफेक्शनिस्ट आमिर एकिकडे चर्चेत असतानाच दुसरीकडे त्याची लेक, आयरा खानही सर्वांच्या नजरा वळवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयरा आणि तिचा प्रियकर, फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचं नातं आता सर्वज्ञात आहे. हे दोघंही अनेकदा काही खास क्षण व्यतीत करताना दिसतात. आता म्हणजे ही जोडी थेट बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहे.


नुपूरनंच इन्स्टाग्रामवर या क्षणांचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘मी अनुभवलेली सर्वात पहिली बर्फवृष्टी... ’, असं कॅप्शन लिहित त्यानं ही पोस्ट केली. ज्यावर अर्थातच आयरानं कमेंट केली.


नुपूर आणि आयरा सध्या त्यांच्या नात्यामुळं या सेलिब्रिटी वर्तुळात प्रकाशझोतात आले आहेत. नुपूर अनेक सेलिब्रिटींचा फिटनेस ट्रेनर आहे. ज्यमुळं तोही एखाद्या सेलिब्रिटीहून कमी नाही.


आमिरची लेक आयरा आणि नुपूर यांनी यंदाच्याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या नात्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनाच दिली.




एकमेकांसोबतचे खास क्षण आणि त्या क्षणांची छायाचित्र त्यांनी पोस्ट केली. व्हॅलंटाईन्स डेला आयरानं नुपूरवच्या प्रेमाची जाहीर कबुली देत सर्वांचंच लक्ष वेधलं.


आमिरची लेक आणि हा सेलिब्रिची फिटनेस ट्रेनर नुपूर यांचं नातं आणि या नात्याचा पाया पाहता, येत्या काळात इतर सेलिब्रिटी जोड्यांप्रमाणेच ही जोडीही लग्नाचा निर्णय घेते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.