मुंबई : आमिर खानची मुलगी आयरा खान अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुपूर शिखरेसोबत तिची एंगेजमेंट झाली. ती आणि नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघं अनेकदा एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. आयरा आणि नुपूर दररोज त्यांचे एकमेकांल फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच आयरा खानने एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने तिच्या भूतकाळातील काही खास क्षणांचे व्हिडिओ शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आठवणींच्या रस्त्यावरून प्रवास.' यातील पहिल्या व्हिडिओमध्ये आयरा तिचा होणारा पती नुपूर शिखरेसोबत वर्कआउट करताना दिसत आहे. वर्कआउट दरम्यान आयरा नुपूरसोबत वारंवार लिप-लॉक करताना दिसली, ज्यामुळे ती ट्रोल झाली.


चाहत्यांनी तिला ट्रोल केलं
आयरा खान तिच्या होणाऱ्या पतीला वारंवार किस करताना पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, दोघांचं लग्न झालेलं नाही, त्यांची फक्त एंगेजमेंट झाली आहे. दोघंही वेडे दिसतात. दोघंही पती-पत्नी असल्यासारखे वागतात. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, थोडीतरी लाज बाळगा मॅडम.



आयरा ३ जानेवारीला करणार कोर्ट मॅरेज!
आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यांच्या एंगेजमेंटला बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता बातमी आहे की, आयरा नुपूर शिखरेसोबत लवकरच लग्न करणार आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार, आयरा खान नुपूर शिखरेसोबत ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर ते राजस्थानच्या उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत. लग्नाला फक्त त्याचे मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित राहणार आहेत.