'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सिनेमात उत्कृष्ठ अभिनयासाठी बरीच मेहनत घेत असतो. आमिर खानच्या करिअरमधील 'राजा हिंदुस्तानी' हा सिनेमा एक मैलाचा दगड ठरला. या ब्लॉकबस्टर सिनेमाने आमिर खान आणि करिश्मा कपूरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. या सिनेमाचे गाणे देखील अतिशय हिट झाले. यामधील 'तेरे इश्क में नाचेंगे' या गाण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारण आहे अभिनेत्री अर्चना पुरन सिंगने केलेला धक्कादायक खुलासा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्चना पुरन सिंहने 'राजा हिंदुस्तानी'मध्ये आमिर खानच्या सासूची आणि करिश्मा कपूरच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. हा रोल निगेटिव रोल होता. अर्चना पूरन सिंहचा यामधील अभिनय प्रत्येकासाठी धक्कादायक होता. 


आमिर खानबाबत अर्चना पुरन सिंगने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणजे आमिर खानने 'तेरे इश्क में नाचेंगे' या गाण्याच्या शुटिंगसाठी चक्क दारु प्यायली होती. आमिर खानने ही दारु कुणासमोर प्यायली नव्हती. पण सिनेमातील त्या सिनमध्ये जीवंतपणा वाटावा या हेतूने तो दारु प्यायला होता.


आमिर खान आपल्या कामात किती परफेक्ट आहे, याबाबत आपल्या सगळ्यांना माहितच आहे. तसेच आमिर खान बॉलिवूड पार्ट्यांपासून दूर असतो. असं असताना त्याच्याबद्दल केलेलं हे स्टेटमेंट नक्कीच चर्चेचा विषय आहे. 


सांगितला 'तो' किस्सा 


अर्चना पूरन सिंगने सांगितलं की, आमिर खानला सुरुवातीचा सीनने संतुष्ट नव्हता. पण त्याने तो सीन केला. अर्चना पुढे म्हणाली की,'मला खात्री नाही. पण मी असं ऐकलं की यावेळी आमिर खान दारुच्या नशेत होता. आमिर खानची रुम माझ्या रुमच्या बाजूला होती. पण तो माझ्यासमोर दारु प्यायला नाही. तो या बदलाने फार खुष नव्हता. पण मला असं वाटतं की, तो प्यायला होता.'


अर्चना पुरन सिंह 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये 


अर्चना पूरण सिंग यांना 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले. अभिनेत्रीने सांगितले की, तिला कोणत्याही पुरस्कारासाठी नामांकन मिळण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. अर्चना पूरण सिंग आता 21 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. हे OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.