`माझे अनेक गर्भपात...`, किरण रावने सांगितलं सरोगसीमागचं कारण
आता तब्बल 10 वर्षांनी तिने पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. किरण राव दिग्दर्शित `लापता लेडीज` हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
Kiran Rao Miscarriage : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. आमिर खान हा अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर खानने चित्रपट निर्माती किरण रावसोबत 2005 मध्ये लग्नबंधनात अडकली. लग्नाच्या 15 वर्षांनंतर आमिर खान आणि किरण राव हे 2021 ला विभक्त झाले. आमिर खान आणि किरण राव यांना आझाद नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण पालक म्हणून मुलाचा एकत्र सांभाळ करत आहेत. आता किरण रावने आझादच्या जन्माआधी तिला अनेक गर्भपातांचा सामना करावा लागला.
किरण रावने नुकतंच 'झूम इंटरटेनमेंट' या वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत किरण रावने बाळाला जन्म देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी एखाद्या स्त्रीला मोठ्या वेदना आणि त्रासाला सामोरे जावे लागले. आता किरण रावने तिला आझादच्या जन्माआधी अनेक गर्भपाताला सामोरे जावं लागल्याचा खुलासा केला आहे. यावेळी काय त्रास होतो, याबद्दलही तिने सांगितले आहे.
"मी अनेक गर्भपाताचा सामना केला"
"धोबी घाट या चित्रपटाची निर्मिती ज्यावर्षी झाली, त्याच वर्षी आझादचा जन्म झाला. आझादच्या जन्माआधी मला आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आम्ही बाळासाठी खूप प्रयत्न केले. पाच वर्षात अनेक वेळा मी गर्भपाताचा सामना केला. मला अनेक वैयक्तिक आणि आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागले. माझ्यासाठी बाळाला जन्म देणे हे खूप कठीण जात होते. पण मी खरोखरच मूल होण्याची वाट पाहत होते. त्यामुळे जेव्हा आझादचा जन्म झाला, तेव्हा करिअरच्या दृष्टीने मला कोणताही निर्णय घ्यावा लागला नाही. मला माझ्या मुलाचे संगोपन करायचे होते", असे किरण राव म्हणाली.
"10 वर्षे ब्रेक घेतल्याची अजिबात खंत नाही"
"किरण रावने नाईलाज म्हणून सरोगसीद्वारे आई होण्याचा निर्णय घेतला. किरण रावने 2011 मध्ये सरोगसीद्वारे आझादला जन्म दिला. त्यावेळी किरण राव ही 37 वर्षांची होती. आझादच्या जन्माचा काळ तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. मी 10 वर्षे एकही चित्रपट केला नाही याचे मला अजिबात खंत वाटत नाही", असेही किरण रावने म्हटले.
दरम्यान किरण रावने मुलगा आझादचा जन्म झाल्यानंतर दिग्दर्शनातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता तब्बल 10 वर्षांनी तिने पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला.