मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्शनिष्ट याचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट गेल्याच आठवड्यात रिलीज झाला होता. या चित्रपटाला सुरुवातीपासूनचं बॉयकॉट करण्यात आल्याने हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर जास्त कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटातील अभिनयासाठी आता आमिर खानने (Aamir khan) 
किती मानधन घेतले आहे, याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानचा (Aamir khan) चित्रपट हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' चा रिमेक होता. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट बॉयकॉट करत नाकारला होता. या बॉयकॉटचा चित्रपटाच्या कमाईवर मोठा असर पाहायला मिळाला. यामुळे आमिर खानला मोठा धक्का बसला आहे.   


चित्रपटाला मोठा धक्का बसला तरी आमिर खानला (Aamir khan) फायदा झाल्याची चर्चा आहे. आमिर खानने या चित्रपटासाठी ५० कोटी घेतल्याचे बोलले जात आहे.पण आमिर खानशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, आमिर दीर्घकाळापासून चित्रपटात प्रॉफीट शेअरींगच्या तत्त्वावर काम करत आहे. या चित्रपटासाठी त्याने कोणतेही शुल्क घेतले नाही.


ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपासून आमिर खान (Aamir khan) त्याच्या कोणत्याही चित्रपटासाठी फी घेत नाही. 'लाल सिंग चड्ढा' हा देखील याचाच एक भाग आहे. आमिर खान प्रॉफीट शेअरींगवर काम करतो. यानुसार चित्रपट बनवण्यात त्याचा मोठा हिस्सा असतो. मात्र 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमक न दाखवू शकल्याने आमिर खानला मोठं नुकसान झालं आहे.  


अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाल सिंग चड्डाला (Laal Singh Chaddha) नेटफ्लिक्सने 160 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. त्याचबरोबर चित्रपटाचे बजेट 180 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. मात्र बजेट इतकी ही चित्रपट कमाई करू शकला नाहीए.