Aamir Khan Andaz Apna Apna : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा काल 14 मार्च रोजी 59 वा वाढदिवस झाला. त्यानिमित्तानं चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. तर आमिरनं देखील त्याच्या चाहत्यांना या निमित्तानं एक गूड न्यूज दिली. आमिरनं त्याच्या करिअरमध्ये सगळ्यात गाजलेल्या, सुपरहिट आणि आयकॉनिक चित्रपट 'अंदाज अपना अपना' च्या सीक्वल विषयी मोठी हिंट दिली आहे. आमिरनं त्याच्या वाढदिवसानिमित्तानं इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन ही घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरनं इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतला त्यावेळी त्यांनी सांगितलं की राजकुमार संतोषी हे 'अंदाज अपना अपना' च्या सीक्वेलवर काम करत आहेत. 30 वर्षांपूर्वी राजकुमार संतोषी यांच्या या चित्रपटात सलमान खान आणि आमिर खान यांचा हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन देखील आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या सीक्वलला घेऊन चर्चा सुरु होती. पण आतापर्यंत काही कन्फर्म नव्हतं. मात्र, आता अखेर आमिरनं या चित्रपटाविषयी फक्त अपडेट दिलेली नाही तर त्यासोबत त्याच्या चाहत्यांना गोड बातमी देखील दिली आहे. आमिर खाननं या विषयी सांगितलं, फिल्ममेकर राजकुमार संतोषी हे 'अंदाज अपना-अपना 2' या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. तर या चित्रपटाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे या चित्रपटाला घेऊन आता लगेच खूप उत्सुक होणं योग्य नाही. 


दरम्यान, 'अंदाज अपना अपना' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतकी चांगली कमाई केली नाही. मात्र, जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला त्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. 


हेही वाचा : 'तिनं मला खेचलं आणि...', सारा अली खानसोबतच्या इंटिमेट सीनवर विजय वर्माचा मोठा खुलासा


या चित्रपटात आमिरसोबत सलमान खान आणि करिश्मा कपूर आणि रवीना टंडन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. तर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, त्या चौघांमध्ये भांडण झाल्याचे देखील म्हटले जात होते. तर दुसरीकडे आमिरनं सलमान खानसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव सांगितला होता. सलमान फार गर्विष्ट आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा त्याचा अनुभव फार वाईट होता. मात्र, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात सलमान आणि आमिर एकत्र डान्स करताना दिसले.