मुंबई : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खानने नवोदित लेखकांसाठी नवी संधी घेऊन आला आहे.


काय आहे ही संधी ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यामध्ये लेखकांना कथा, पटकथा लिहिण्याची संधी मिळणार आहे. जी कथा परिक्षकांना आवडेल आणि या स्पर्धेत जिंकणाऱ्या आपली कथा बॉलिवूडमधल्या मोठ्या दिग्दर्शकांसमोरही मांडता येणार आहे.


 व्हिडिओ शेअर करून दिली माहिती...


याची माहिती आमिरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे. ‘सिनेस्तान’असं या स्पर्धेचं नाव आहे. १५ जानेवारी २०१८ ही कथा पाठवण्याची अंतिम तारीख आहे. राजकुमार हिरानी, जुही चतुर्वेदी, अंजुम राजाबली यांच्यासह स्वत: आमिर या स्पर्धेचा परीक्षक असेल. यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला scriptcontest.cinestaan.com वर अर्ज करावा लागेल. सहभागी झालेल्यांपैकी ५ विजेते निवडण्यात येतील. विजेत्यांना ठराविक रोख रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात येईल.