आमिर खानचं घटस्फोटावर मोठं वक्तव्य; म्हणाला, `माझ्या मनात अजूनही रीना`...
बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकापासून ते आज 2022 पर्यंत, प्रेक्षक अभिनेत्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. आमिर खानने केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे तर चित्रपटांच्या आशयानेही लोकांची मने जिंकली आहेत. आमिर खानला त्याचे चाहते बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याने एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये आमिर खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्याविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे.
घटस्फोटाबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य
आमिर खानने त्याच्या घटस्फोटाबद्दलही खुलेपणाने वक्तव्य केलं आहे. आमिर म्हणाला, 'माझ्या मनात अजूनही रीना जीबद्दल आदर आणि प्रेम आहे. आम्ही एकत्र मोठे झालो आहोत. किरण जी बद्दल सांगायचं झालं तर, आम्ही एकमेकांवर नाराज नाही, भांडणही नाही, फक्त आमच्या नात्यात थोडे बदल झाले आहेत.' आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटोनंतर अनेक अफवांनी जोर धरला होता. अनेक प्रकारचे तर्कवितर्क या घटस्फोटानंतर लावले जात होते. या दोघांनी का घटस्फोट घेतला यामचं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही.
लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात आमिर खान दिसणार
आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे आणि त्याच दिवशी अक्षय कुमारचा रक्षाबंधनही रिलीज होणार आहे. म्हणजेच बॉक्स ऑफिसवर मिस्टर परफेक्शनिस्ट आणि खिलाडी यांच्यात जबरदस्त स्पर्धा होणार असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
हा चित्रपट 'द फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे जो सुपरहिट ठरला होता. करीना कपूर पुन्हा एकदा आमिर खानसोबत दिसणार आहे. तर त्याचबरोबर नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आली होती पण यावेळी हा सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.