मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट दिसणार एका नव्या ढंगात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधील अभिनेता आमीर खान आता आपल्याला मराठीत पाहायला मिळणार आहे. आमीर खान झी मराठीच्या माध्यमातून मराठी सृष्टीत पदार्पण करत आहे. आमीर खान आणि पाणी फाऊंडेशन हे नातं फार जुनं आहे. 


महाराष्ट्रात गावोगावी जाऊन आमीर खानने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. "तुफान आलंया" या मालिकेच्या माध्यमातून आता आमीर खान झी मराठीवर एक नवा कोरा शो होस्ट करत आहे. आमीर खान या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे. 



आमीर खानने मराठीत पदार्पण करणं हे त्याच्या चाहत्यांना सुखावणार आहे. आमीर खान मराठीचं शिक्षण घेत असल्याचं त्याने या अगोदर देखील सांगितलं होतं. पण योग्य शिक्षण घेतल्यावरच आपण मराठीत बोलू असं आमीर म्हणाला होता. आता आमीर खान या प्रोमोत आपल्याशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहे. 


'तुफान आलंया' या मालिकेच्या मार्फत आमीर खान अशा लोकांशी संवाद साधणार आहे ज्यांनी आपल्या जिद्दीने अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. हा शो 31 मार्चपासून सुरू होणार आहे. हा कार्यक्रम दर शनिवारी रात्री 9.30 वाजता असणार आहे.